पुण्यात कोरोनाच्या विर्सजनाचा 'श्रीगणेशा'; काय घडलं वाचा!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

कोरोनाला लगाम घालण्यासाठी महापालिका-पोलिस वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. तरीही, हा रोग रोज जवळपास शंभर जणांना आपल्या कवेत घेत आहेत.

पुणे : पुणेकरांना घायकुतीला आणलेल्या कोरोनाच्या विर्सजनासाठी पुण्यात गुरुवारी (ता.३०) नव्या मोहिमेचा 'श्रीगणेशा' झाला आहे. महापालिका, पोलिसांच्या दिमतीला येत; कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या मोहिमेत दोनशे मंडळांचे शकडो कार्यकर्ते कोरोना वेढलेल्या पेठांमधील लोकसंख्येचा भार हलका करण्यासोबतच रुग्ण, त्यांचे नातेवाईक, गरजूंसह संचारबंदीच्या अंमलबजावणीला हातभार लावणार आहेत. त्याकरिता दोन-अडीच हजार कार्यकर्त्यांची फौज रस्त्यांवर उतरेल. 

- Big Breaking : बारामती झाली कोरोनामुक्त; अखेरचा पेशंट घरी परतला!

दरम्यान, महापालिका, पोलिसांच्या मदतीसाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते पुढे आले आहेत. त्यांच्याशी चर्चा करून पुढच्या कार्यवाहीचे स्वरुप आणि अंमलबजावणीची दिशा ठरविण्यात येत आहेत, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. 

- पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

कोरोनाला लगाम घालण्यासाठी महापालिका-पोलिस वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. तरीही, हा रोग रोज जवळपास शंभर जणांना आपल्या कवेत घेत आहेत. परिणामी, कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने पुणेकरांची धास्ती वाढली आहे. तर, गेल्या पावणेदोन महिन्यांपासून महापालिका, पोलिसांची यंत्रणा झटत आहे. त्याचा परिणाम, यंत्रणेवर ताण आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या कार्यवाह्यांसह पोलिसांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची फौज उभी राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. 

- केंद्राचे पथक म्हणते, बारामतीचे हे काम देशभरात व्हावे...

या पार्श्‍वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळांच्या पुढाकारातून प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. 
पुणेकरांचा कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी शक्‍य तेवढे सहकार्य करण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केला आहे. त्यामुळे पुढच्या चार दिवसांत पहिल्या टप्प्यांत तब्बल पाचशे कार्यकर्त्यांची फौज उतरणार आहे. 

- मोठा दिलासा : महाराष्ट्रात लॉकडाऊन नव्हे, एजंट बेस्ड मॉडेलचा पर्याय

महापौर मोहोळ म्हणाले, ''पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते उस्फूर्तपणे पुढे आले आहे. सध्याची नेमकी गरज, कामेचे स्वरुप आणि सुरक्षिततेच्या उपायांबाबत मते जाणून घेण्यात आली आहेत. त्यातून आता रोज ज्या ठिकाणी गरज भासेल, त्याठिकाणी या कार्यकर्त्यांची मदत घेतली जाणार आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Mandal activists have taken the initiative to win the battle against Coronavirus