कोंढव्यातून इसिसशी संबंधित 5 जण ताब्यात?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

पुणे - कोंढव्यातील कौसरबाग परिसरातून इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पाच जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) सकाळी दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी कोंढवा पोलिसांच्या मदतीने कौरसबाग येथे ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांमध्ये काही परदेशी तरुणांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. 

एटीएसच्या पुणे विभागाने ही कारवाई केली. या संदर्भात राज्याचे एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एटीएसकडून काही संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.

Web Title: 5 people Related ISIS in kondhava?