गेल्या 54 वर्षात होते, तेवढे कर्ज भाजपने 5 वर्षात केले : पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

''भाजप सरकारने राज्याला कर्जबाजारी केले आहे. या पाच वर्षात अडीच लाख कोटी रूपयांचे कर्ज आहे. याआधीच्या ५४ वर्षात एवढे कर्ज होते, तेवढे भाजपने पाच वर्षात कर्ज केले'', अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. आज पुण्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

पुणे  : ''भाजप सरकारने राज्याला कर्जबाजारी केले आहे. या पाच वर्षात अडीच लाख कोटी रूपयांचे कर्ज आहे. याआधीच्या ५४ वर्षात एवढे कर्ज होते, तेवढे भाजपने पाच वर्षात कर्ज केले'', अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. आज पुण्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

''धरणे भरली आहे, तरीही पुणेकरांना पिणयासाठी पाणी मिळत नाही. पाण्यासाठी लोक आंदोलन करीत आहेत. पाऊस नसतानाही मी पालकमंत्री म्हणून पुणेकरांना पाणी कमी पडू दिले नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

अजित पवारांनी सांगितला पुण्यातील चार मतदारसंघावर दावा
आघाडीत समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे काही जागा अन्य पक्षाला सोडणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील दोन दिवस चर्चा होईल. असे सांगून त्यांनी, पुढील महिनाभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्तांनी जोमाने काम करावे असे आवाहन केले. पुण्यातील पर्वती, हडपसर, वडगावशेरी, खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याची घोषणा आज पवारांनी केली. कसबा, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि कोथरुड काँग्रेसला सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.''

कोथरूड मतदारसंघ अखेर मनसेला !  
पुणे : कोथरूड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्यायचे ठरले आहे. काँग्रेसला तसे सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडे पण उमेदवार नसल्यामुळे असे ठरले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In 5 years BJP made the same loan was made In the last 54 years said Ajit Pawar