पन्नास कंपन्यांची बॅंकखाती सील

Bank
Bank

पिंपरी - कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची (पीएफ) रक्‍कम न भरणाऱ्या दोनशे कंपन्या शहरात आढळल्या असून, त्यांच्यावर कारवाईला सुरवात झाली आहे. यामध्ये आयटी कंपन्यांना कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे.  पीएफ कार्यालयाने आतापर्यंत पीएफ न भरणाऱ्या ५० कंपन्यांची बॅंक खाती सील केली आहेत. या कारवाईतून एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये आठ कोटी ६० लाख रुपयांची वसुली केली आहे. 

पीएफ कायद्यानुसार कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची पीएफची रक्‍कम भरणे बंधनकारक आहे. मात्र, काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि ही रक्‍कम जमा करीत नसल्याचे पीएफ कार्यालयाचे निरीक्षण आहे. अशा कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्याकडील रेकॉर्डची तपासणी सुरू करण्यात आली. या माहितीची छाननी लवकरच करण्यात येणार आहे. हिंजवडी आणि तळवडे परिसरात कार्यरत असणाऱ्या आयटी कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगार आहेत. यापैकी काही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना पीएफची रक्‍कम दिली गेली नसल्याचे आढळले आहे. पीएफची रक्‍कम न भरल्यास संबंधित कंपनीवर कायद्यातील कलम ७ अ नुसार कारवाई करण्यात येते. वारंवार नोटीस पाठवूनदेखील कंपनीने उत्तर न दिल्यास संबधितांविरोधात अटक वॉरंट काढण्यात येते. पीएफची रक्‍कम न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.

पीएफची रक्‍कम जमा होत नसल्याच्या तक्रारी कार्यालयाकडे आल्या होत्या. याखेरीज पीएफ कार्यालयाने केलेली तपासणी, कामगार संघटनांनी याबाबत दिलेली माहिती याच्या आधारे याचा शोध घेण्यात आला आहे. आगामी काळात ही मोहीम सुरू राहणार आहे.
- अमिताभ प्रकाश, क्षेत्रीय पीएफ आयुक्‍त, आकुर्डी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com