Ganeshotsav 2020 : पुण्यातील गणेश मंडळांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Ganesh_Mandal_Pune
Ganesh_Mandal_Pune

Ganesh Festival 2020 : पुणे : सामाजिक सुधारणा हा मूळ उद्देश कायम ठेवून सातत्याने काम करणाऱ्या पुणे शहरातील ५० गणेश मंडळांनी या वर्षी रस्त्यावर मंडप न घालता मंदिरातच गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे (Coronavirus) सावट आहे. शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय स्वतः गणेश मंडळांनीच घेतला आहे. राज्य सरकारनेही (Maharashtra Govt.) तशाच पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत.

पुण्यातील गणेशोत्सवात दरवर्षी लाखो गणेशभक्त सहभागी होत असतात. वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविणारी गणेश मंडळे (Ganesh Mandal) गणेशोत्सवाच्या काळात आकर्षक देखावे उभे करतात, ते पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे या उत्सवावर अनेक मर्यादा आल्या आहेत. मंडळांनी स्वतःहून यंदा मंदिरातच गणपतीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पुढचे पाऊल म्हणून पुण्यातील महत्त्वाच्या ५० गणेश मंडळांनी शनिवारी (ता.८) गणेशोत्सवात मंडप न टाकता मंदिरामध्येच हा उत्सव साजरा करण्याचे जाहीर केले. या मंडळांनी एकत्र येऊन या संदर्भातील निवेदन पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांना दिले.

हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टच्या वतीने शहरातील प्रमुख सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत रस्त्यावर मंडप न टाकता मंदिरामध्येच साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला. या बैठकीस बाबू गेनू मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष शामराव मानकर, राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, एरंडवणा येथील शहीद भगतसिंग मित्र अध्यक्ष शिवा मंत्री, कोथरूड येथील श्री दत्त मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र मगर, समस्त गावकरी येरवडा गाव मित्रमंडळाचे अध्यक्ष सुहास राजगुरू, येरवडा येथील शिवाजी मंडळाचे अध्यक्ष अरुण वाघमारे, कर्वेनगर येथील साई दास मित्र मंडळाचे अध्यक्ष सतीश बराटे, समस्त गावकरी येरवडा गाव मित्रमंडळाचे अध्यक्ष सुहास राजगुरू, अखिल बिबवेवाडी मंडळाचे महेश बिबवे,  कोरेगाव पार्क येथील जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बर्गे , सुहास रानवडे आधी या बैठकीस उपस्थित होते.

'' कोरोनाच्या संकटात सामाजिक भान जपत मंडळांनी हा निर्णय घेतला आहे. गणपती विराजमान झाल्यानंतरही दर्शनासाठी योग्य अंतर ठेवून रांगा, नारळ-फुले न स्वीकारणे, दर्शनासाठी आलेल्यांचे स्कॅनिंग, सॅनिटायझरचा वापर आदी काळजीही गणेश मंडळांकडून घेतली जाणार आहे."
- बाळासाहेब मारणे, अध्यक्ष, हुतात्मा बाबू गेनू मंडळ

"सध्याच्या परिस्थितीत गणेश मंडळांनी घेतलेला हा निर्णय स्तुत्य आणि स्वागतार्ह आहे. पोलिसांच्या आवाहनास मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीतीही कमी झाली आहे."
- स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com