विद्यार्थ्यांनो, डिप्लोमा अ‍ॅडमिशन सोमवारपासून होणार सुरु

Diploma admission process from Monday
Diploma admission process from Monday

पुणे : इयत्ता १०वी नंतरच्या तंत्रनिकेतन पदविकेसह इयत्ता बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या पदविका प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण विभागाने आज जाहीर केले आहे. १० ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तंत्रनिकेतन प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश १० ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. तंत्रशिक्षण विभागाने तंत्रनिकेतन प्रवेशाबरोबरच इतर अभ्यासक्रमाचे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. १० ते १५ ऑगस्ट या दरम्यान प्रवेश अर्ज भरताना येणार आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पदविका व तंत्रनिकेतनसाठी अर्ज करताना खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ४०० रुपये, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे ३१ मार्च २०२१ पर्यंतचे वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. प्रमाणपत्र सादर करू न शकणारे विद्यार्थ्यांना राखीव जागांवर दावा करता येणार नाही, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली.

दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशासाठी अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईद्वारे कागदपत्राची पडताळणी करता येईल. ज्यांना कागदपत्रे अपलोड करता येणे शक्‍य नाही, अशा विद्यार्थ्यांनी जवळच्या सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्राची पडताळणी करता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये यासाठी त्यांना तारीख व वेळ ठरवून दिले जाईल. 

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर
 

महत्वाच्या तारखा 
अर्ज करण्याची मुदत : १० ते २५ ऑगस्ट
कागदपत्र पडताळणी : ११ ते २५ ऑगस्ट
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध : २८ ऑगस्ट यादीवर विद्यार्थ्यांचे आक्षेप : २९ ते ३१ ऑगस्टऑगस्ट
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : २ सप्टेंबर

पोलिस बनून हाॅटेलमध्ये शिरले, जेवले अन्...

तंत्रनिकेत प्रवेशासाठी संकेतस्थळ : http://poly20.dtemaharashtra.org

पदवी प्रवेशासाठी संकेतस्थळ :
https://posthscdiploma2020.dtemaharashtra.gov.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com