
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुर्नविकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
'बालगंधर्व'च्या डागडुजीसाठी फक्त 75 लाखच खर्च; अजितदादांनी प्रशासनाला दिला 'हा' आदेश
पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या (Balgandharva Rangmandir) तळघरात पाणी साचणे, स्वच्छता गृहाची दुरवस्था, अस्वच्छता या कारणामुळं कलाकार आणि रसिक त्रस्त झालेले असताना गेल्या पाच वर्षात १ कोटी ६४ लाख रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद केली होती. पण, त्यापैकी फक्त ७५ लाख रुपयेच खर्च झाल्याचे समोर आले आहे.
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुर्नविकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाचे बदल करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार अभ्यास करून अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे. दरम्यान, हे नवे बालगंधर्व रंगमंदिर बांधण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. काम सुरू झाल्यानंतर ते पूर्ण होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी मोठी मागणी असते. प्रसिद्ध अभिनेते व कलाकार मंडळी येथे त्यांची कला सादर करतात, पण त्यांना तेथे योग्य प्रमाणत सुविधा मिळत नसल्याने त्याबाबत वारंवार तक्रारीही केल्या जात होत्या. पण, महापालिकेकडून जुजबी डागडुजी केली गेली असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. भवन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी बालगंधर्वच्या देखभाल, दुरुस्तीसाठी २० लाख रुपयांची तरतूद होती, त्यापैकी १४.७४ लाखाचा खर्च करण्यात आला. यामध्ये कलादालनाच्या परिसरात दुरुस्तीसाठी ६. ९७ लाख व सराव खोलीतील दुरुस्तीसाठी ७.७७ लाखाचा खर्च केला.
हेही वाचा: CM ठाकरे-निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक, काय झाली चर्चा?
२०१८-१९ मध्ये १८. ४० लाखाची तरतूद होती, त्यापैकी रंगमंदिराच्या वास्तूमध्ये दुरुस्ती करणे ८. ३४ लाख खर्च केले. २०१९-२० मध्ये ४० लाखाच्या तरतुदीपैकी मेकअप रूम आणि इतर विद्युत विषयक कामांसाठी ३.९१ लाख व इतर दुरुस्तीसाठी ९.८९ लाख असे एकूण १३.८० लाखाचा खर्च केला होता. तसेच प्रेक्षागृहातील खुर्च्यांची दुरुस्ती व कुशनिंगसाठी ८ लाख रुपये खर्च केले होते. कलादालन आणि रंगमंदिरातील दुरुस्तीविषयक कामांसाठी १. ४१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. २०२०-२१ या वर्षामध्ये अंदाजपत्रकात ४० लाखाची तरतूद होती, त्यातून दुरुस्तीसाठी १५. ६८ लाख रुपये खर्च केले. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३० लाख रुपयांच्या तरतुदी होती, त्यापैकी ६. ४८ लाख रुपये खर्च झाले आहेत. गेल्या पाच वर्षात महापालिकेने एकूण ७४. ७९ लाख रुपये खर्च केले आहेत. पण, तेथील समस्या कायम असल्याचे समोर आले आहेत.
हेही वाचा: मी भाजपमध्ये असूनही अजित पवारांचं मला चांगलं सहकार्य : आमदार शिवेंद्रराजे
विद्युत विभागासाठी ४० लाखाची तरतूद
बालगंधर्व रंगमंदिरातील एसी, ध्वनी यंत्रणा, प्रकाश व्यवस्था यासह इतर विद्युत विषयक कामासाठी सांस्कृतिक विभागाकडून दरवर्षी ३० ते ४० लाख रुपयांची तरतूद विद्युत विभागाला उपलब्ध करून दिली जात होती, त्यातून देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात, असे विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.
Web Title: 50 Percent Funds Remaining For Repair Of Balgandharva Rangmandir
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..