esakal | इंजिनिअरिंग, फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; ५० टक्के गुणांची अट रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Admission

इतर राज्यांमध्ये अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमांस खुल्या प्रवर्गास ४५ टक्के, तर मागास प्रवर्गास ४० टक्के गुणास प्रवेश मिळत होता.

इंजिनिअरिंग, फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; ५० टक्के गुणांची अट रद्द

sakal_logo
By
प्रा. प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ग्रुपला ४५ टक्के, तर मागासवर्गीस विदयार्थ्यास ४० टक्के गुण पात्रतेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के, तर मागास प्रवर्गासाठी ४५ टक्के गुणांची अट होती. शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रांमध्ये हा बदल केल्यामुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांस प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांस दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बालिका दिन : आजही सावित्रीच्या लेकींची उच्च शिक्षणात होतेय परवड​

अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्य वगळता इतर राज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ४५, तर मागास प्रवर्गातील 
विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के गुणांची अट होती. राज्यांमध्येही इतर राज्यांप्रमाणे पात्रता करावी, अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत असोशिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्युट इन रुरल एरिया संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सदस्य राजीव जगताप यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरभ विजय, संचालक डॉ. अभय वाघ यांचेसमवेत बैठक घेऊन भूमिका मांडली होती.

विद्यार्थी म्हणताहेत, राज्यसेवेची पूर्व परीक्षा नवीन प्रश्नपत्रिकेच्या आधारे घ्या​

कर्नाटकसह इतर राज्यांप्रमाणे गुणांची अट शिथील करावी, अशी संघटना, विद्यार्थी आणि पालकांची मागणी होती त्यास यश आले आहे. शासनाने चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि व्यावसायिक 
अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीमध्ये किमान १ गुण आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये ग्रुपला ४५ टक्के, तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांस ४० टक्के गुणांची अट निर्धारित केली आहे. या बदलांमुळे केवळ गुणांमुळे या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

 पेशवेकाळापासूनचा पुण्यातील जुना बाजार कोरोनामुळे बंद; अनलॉकची प्रतीक्षा

याबाबत असोशिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्युट इन रुरल एरिया संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ म्हणाले, ''इतर 
राज्यांमध्ये अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमांस खुल्या प्रवर्गास ४५ टक्के, तर मागास प्रवर्गास ४० टक्के गुणास प्रवेश मिळत होता. परंतु राज्यांमध्ये खुल्या प्रवर्गास ५० टक्के, तर मागास प्रवर्गास ४५ टक्के गुणांची अट होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहत होते. या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top