विद्यार्थी म्हणताहेत, राज्यसेवेची पूर्व परीक्षा नवीन प्रश्नपत्रिकेच्या आधारे घ्या

mpsc.jpg
mpsc.jpg

पुणे : गेली सात महिने परीक्षा होणार, नाही होणार अशी चर्चा स्पर्धा परीक्षा वर्तुळात सातत्याने होत असतानाच ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते. पण ऐन वेळी राज्यसरकारने कोरोनाचे कारण सांगून परीक्षा अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलली. त्यामुळे तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका जिल्हा केंद्रावर व प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोहचल्या होत्या. त्यामुळे या प्रश्नपत्रिका सुरक्षित राहणार का असा प्रश्न विद्यार्थी वर्गाने उपस्थित केला आहे. कारण याआधी अनेक परीक्षांमध्ये पेपर फुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे येत्या काळात घेण्यात येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी आयोगाने नवीनच पेपर काढावा अशी मागणी विद्यार्थी वर्गाने केली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा अचानक रद्द झाल्याने आयोगाचे नियोजित पूर्व परीक्षेचे व्यवस्थापन कोलमडले. ११ ऑक्टोंबर रोजी परीक्षा होणारच या दृष्टिकोनातून आयोगाने नियोजन केले होते. त्यामुळे परीक्षेच्या दोन दिवस आधीच राज्यातील ७६१ परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहचल्या होत्या. पण अचानक परीक्षा रद्द झाल्याने केंद्रावर पोहचलेल्या प्रश्नपत्रिका कशा सुरक्षित राहणार असा प्रश्न विद्यार्थी वर्गाला पडला आहे.
 

स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी आपल्या जिवाचं रान करतात. यामध्ये सरासरी पाच ते सहा वर्षे साधारण अभ्यास करत असतो. बऱ्याच वर्षी जागाच भरल्या जात नाहीत. निकाल लागण्यासाठी दोन ते तीन वर्षे वाट पहावी लागते. त्यातच कोरोनामुळे नियोजित असलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यात आली. आत्ता कधी होणार आहे हे माहीत नाही जेव्हा कधी आयोग परीक्षा घेईल. त्यावेळी आयोगाने जुन्या प्रश्नपत्रिकेवर परीक्षा न घेता नवीन प्रश्नपत्रिका काढून घ्यावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी विशाल गाढवे याने केली आहे.

 

 

हाताशी असेल त्या साधनांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागला. या काळात अनेक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.  तब्बल सहा महिने परीक्षेवरून टोलवा टोलवी चालू आहे.  या परीक्षेला राज्यातील एकूण दोन लाख 61 हजार विद्यार्थी एकूण बसणार आहेत. या आधी अनेक वेळा पेपर फुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पेपरची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे. आयोगाने आत्ता नवीन प्रश्नपत्रिका काढून राज्यसेवा पूर्व परीक्षा घ्यावी.

-मयूर शिंदे, विद्यार्थी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या प्रकारे याआधी परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवल्या जात होत्या. तशीच काळजी आत्ताही आम्ही घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी वर्गाने कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही.

-सुनील अवताडे, एमपीएससी सहसचिव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com