esakal | पुण्याला हवाय रोज ५० टन ऑक्सिजन

बोलून बातमी शोधा

 ऑक्सिजन
पुण्याला हवाय रोज ५० टन ऑक्सिजन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी ऑक्सिजनची मागणी (Demand of Oxygen) मात्र वाढत चालली आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन पुणे महापालिकेने (Pune Muncipal आता दररोज ५० टन ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली आहे.

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण केली आहे. तसेच ६०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर देखील उभारले आहे. या सर्व रुग्णालयांना मिळून सध्या दररोज ४० ते ४२ टन ऑक्सिजनची गरज भासते; परंतु तेवढासुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. जेमतेम ३५ ते ३६ टन ऑक्सिजनचा पुरवठा होतो. (50 tons of oxygen needed per day to Pune)

हेही वाचा: पुण्यात आजही लसीकरण बंद

हेही वाचा: लशीचं रडगाणं!

महापालिकेने बिबवेवाडी येथील ईएसआय रुग्णालयात नव्याने शंभर बेडचे हॉस्पिटल उभारले आहे. तसेच डॉ. नायडू आणि बाणेर येथील रुग्णालयात देखील बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. अन्य ठिकाणी ऑक्सिजन बेडची सुविधा वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी सर्व रुग्णालयांसाठी मिळून सुमारे ५० टन ऑक्सिजनची गरज महापालिकेला भासणार आहे. तेवढ्या ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा