esakal | पुण्यातील या परिसरात महिला कोरोना पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

कोरोनाची लागण झालेली महिला पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

पुण्यातील या परिसरात महिला कोरोना पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्‍यातील तळेगाव ढमढेरे येथे एका 50 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली असून, या महिलेचा रिपोर्ट "एनआयव्ही'कडून पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली. 

पुणेकर तरुणाच्या संगीत संयोजनातून 21 देशांतील कलाकारांकडून अभिनव कलाकृती 

कोरोनाची लागण झालेली महिला पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. यापूर्वी तिने तळेगावातील दोन खासगी दवाखान्यात उपचार घेतले आहे. ते दोन्ही दवाखाने आरोग्य विभागाने सील केले आहेत. या दवाखान्यातील महिलेवर उपचार करणारे डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना आणि या महिलेच्या संपर्कातील नागरिकांना आरोग्य विभागाने येथील मंगल कार्यालयात होम क्वारंटाइन केले आहे. तसेच, त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्याचे काम चालू केले असल्याची माहिती डॉ. घोरपडे यांनी दिली. 

तुमच्या पिढ्या वाढताहेत ते ठिक, पण जमिनीचे काय

तळेगाव ढमढेरे येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येथील प्रशासनाने अगोदरपासूनच विशेष खबरदारी घेतली आहे. सर्वांनी लॉकडाउनचे नियम पाळले आहेत, परंतु अचानक एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने विशेष खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. यापूर्वी जवळच शिक्रापूरमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तळेगाव ढमढेरे गावाची नोंद शासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

तळेगाव ढमढेरे येथे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी प्रशासनाने तळेगावातील सर्व रस्ते सील केले असून, गावात पुन्हा एकदा फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, गावात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे, अशी माहिती तलाठी डी. एस. भराटे व ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांनी दिली. नागरिकांनी लॉकडाउनचे नियम पाळून घरातच बसून कुटुंबाची काळजी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. 

loading image
go to top