
Pune Municipal Corporation
sakal
पुणे - पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकी प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता मतदार याद्या आणि मतदान केंद्रांची तयारी सुरु केली आहे. मतदारांच्या सोईसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे. यावेळी सुमारे ५ हजार मतदान केंद्रांची आवश्यकता आहे. यासाठी जागांची पाहणी लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.