World Womend Day : ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेसाठी 5000 हुन अधिक जणांची नोंदणी

दोन दिवसीय कार्यशाळेसाठी पाच हजार हुन अधिक लोकांनी नोंदणी केली असून, कार्यशाळेस पहिल्या दिवशी राज्यभरातून महाविद्यालयीन तरुणी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
World Womend Day : ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेसाठी 5000 हुन अधिक जणांची नोंदणी
Summary

दोन दिवसीय कार्यशाळेसाठी पाच हजार हुन अधिक लोकांनी नोंदणी केली असून, कार्यशाळेस पहिल्या दिवशी राज्यभरातून महाविद्यालयीन तरुणी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त (Womens Day) टाटा प्ले बिंज प्रस्तुत यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) 'चॅम्पियन द चेंज - संवाद महिलांचा, महिलांसाठी' ही दोन दिवसीय ऑनलाईन मोफत मार्गदर्शन कार्यशाळा (Workshop) सामाजिक बदलांसाठी, महिलांच्या विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी फाईन ज्वेलरी क्षेत्रातील जोस आलुक्कास, वूट, व हॅवेल्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. दोन दिवसीय कार्यशाळेसाठी पाच हजार हुन अधिक लोकांनी नोंदणी केली असून, कार्यशाळेस पहिल्या दिवशी राज्यभरातून महाविद्यालयीन तरुणी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रमुख मार्गदर्शकांचे मनोगत :-

'आयुष्यात येणाऱ्या आव्हानाचा न घाबरता व आव्हानांपासून दूर न जाता आत्मविश्वासपूर्वक स्वतः सामना करा. आव्हानाचा यशस्वीपणे सामना केल्याशिवाय जीवनात यशस्वी होता येत नाही. आज वैद्यकीय क्षेत्रात सातत्यपूर्ण संशोधन आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. तसेच, सामाजिक बदलांसाठी व समाजाच्या विकासासाठी प्रत्येकाने मार्गात येणाऱ्या समस्यांवर स्वतः उपाय शोधून पुढे मार्गक्रमण करत राहावे. आज मुलींसाठी सर्व क्षेत्रात संधी असून, लष्करात व एनडीए मध्ये देखील संधी उपलब्ध झाली आहे. नकारात्मक विचार व गोष्टीत वेळ न घालवता आपले ध्येय निश्चित करून, ते वेळेत गाठण्यासाठी आत्मविश्वासपूर्वक प्रयत्न करावेत. सामाजिक बदलांसाठी शासकीय यंत्रणा व इतरांना दोष न देता, तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन प्रयत्न करा ”.

- डॉ. माधुरी कानिटकर (लेफ्टनंट जनरल पीव्हीएसएम, एव्हीएसएम व व्हीएसएम सेवानिवृत्त)

'ग्रामीण भागातील महिलांनी आपले जीवनमान व राहणीमान उंचाविण्यासाठी तसेच आपल्या कुटुंबाला स्थिरता उपलब्ध करून , देण्यासाठी एकत्र येऊन किंवा व्यक्तिगत पातळीवर शेतीपूरक व्यवसाय तसेच, ग्रामीण भागात गरजेच्या असलेल्या वस्तूनिर्मिती व विक्री व्यवसाय, सेवा व्यवसाय आणि इतर छोटे - छोटे व्यवसाय (स्टार्टअप्स) सुरु करणे आवश्यक आहे. तसेच, व्यवसायासाठी शासकीय स्तरावर व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आवश्यक प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तसेच, महिलांनी व्यवसायाशी संबंधित व बँकिंग क्षेत्रातील व्यवहारांशी संबंधित अद्यावत (डिजिटल बँकिंग व्यवहार) शिक्षण व प्रशिक्षण घेऊन, व्यवसाय वृद्धीसाठी बँकिंग क्षेत्रांची मदत घेऊन, प्रगती करावी '.

- चेतना गाला सिन्हा, संस्थापक अध्यक्ष (माणदेशी बँक)

"प्रत्येक क्षेत्रातील महिलांना समाजात वावरत असताना, कुटुंबात, प्रवासात, नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. तेंव्हा महिलांनी सकारात्मक वृत्तीने व धैर्याने अडचणींवर मात करून, आपला प्रवास सुरु ठेवावा. प्रत्येक महिलेमध्ये टॅलेंट असते फक्त ते माहित नसल्याने विकासाला मर्यादा पडतात. महिलांनी स्वतः मधील सुप्त गुण ओळखून, विविध क्षेत्रात कार्य करावे. स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गांनी महिलांनी आवाज उठवा. महिला कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार करते, प्रत्येक सदस्यासाठी जगते, पण स्त्री स्वतःचा विचार कधी करत नाही. प्रत्येक महिलेने स्वतःचा विचार करून, स्वतःसाठी सुद्धा जगावे. तसेच, जो मार्ग निवडला आहे त्या मार्गावर पुढे चालावे”.

- डॉ. रागिणी पारेख, विभागप्रमुख, नेत्रविभाग जे. जे. रुग्णालय

'विविध क्षेत्रात वरिष्ठ पदावर महिला वर्गांचे प्रमाण अत्यल्प आहे. आज ही मुलींच्या शिक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी घरातील महिलेने पुढाकार घेतल्यावर, कुटुंबातील इतर सदस्यांकडून व समाजाकडून विरोध केला जातो. यासाठी समाजामध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. आज खेडी स्वयंपुर्ण व मॉडर्न होत असून, ग्रामीण भागात तालुकास्तरावर विविध क्षेत्रात रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी महिलांनी ग्रामीण भागात जाऊन, शोध घेणे आवश्यक आहे व त्यादृष्टीने विविध शिक्षण - प्रशिक्षण घेऊन, स्वतःच्या पायावर उभे राहून, स्वतःला सिद्ध करावे'.

- पल्लवी उटगी, संचालक, सुपर बॉटम्स

'कोरोना काळात नारीशक्तीचे कार्य व महत्व अधोरेखित झाले आहे. लॉकडाऊन व कोरोना विषाणूजन्य साथीच्या काळात जगभरातील महिलांमध्ये काही गोष्टींमध्ये साम्य आढळून आले. गृहिणी म्हणून ही महिलांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची काळजी घेतली, शिवाय कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत रुग्णांच्या सतत संपर्कात महिला नर्स होत्या. तसेच आरटीपीसीआर टेस्टिंग, लॅब प्रोसेसिंग व कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महिला नर्स यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. (कोविड १९) मध्ये ग्रामीण भागात सर्वात जास्त अशा वर्कर, अंगणवाडी सेविका या महिलांनी हेल्थ वर्कर म्हणून फ्रंट लाइनवर कार्य केले आहे".

- डॉ. प्रिया अब्राहम, संचालक, आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ विरोलॉजी

World Womend Day : ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेसाठी 5000 हुन अधिक जणांची नोंदणी
बारामती नगरपालिका प्रक्रीया केलेल्या पाण्याच्या विक्रीतून उत्पन्न मिळविणार

ग्रामीण भागातील अशिक्षित , कमी शिक्षित महिलांनी एकत्र येऊन , बचत गटाच्या माध्यमातून पैसे बचत करण्यास सुरुवात केली. बचतीच्या पैशातून व बँकेकडून अर्थसहाय्य घेऊन महाराष्ट्रीयन मसाल्यांचा उद्योग सुरु केला. आज हा व्यवसाय 'अंबिका' मसाले या नावाने लोकप्रिय असून , मसाल्याची विक्री राज्याच्या काना- कोपऱ्यात होत आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील महिला एकत्र येऊन , बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय करू शकतात याबाबत 'अंबिका मसाले' च्या कमलताई परदेशी यांनी मार्गदर्शन केले.

मराठी खाद्यपदार्थांची रेसिपी विविध समाज माध्यमांवर अपलोड करून , मराठी खाद्यपदार्थ जगभर पोहोचवून 'मधुरा रेसिपीज' च्या माध्यमातून व्यवसायिक प्रगती कशी झाली व समाज माध्यमे रोजगार निर्मितीसाठी प्रभावी माध्यम कसे ठरू शकते याबाबत मधुरा बाचल यांनी मार्गदर्शन केले. तसेच, बहुराष्ट्रीय कंपनी मधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून, स्वतःला सिद्ध करण्यासाठी लेदर सिलिंग बॅग निर्मिती व्यवसायाशी संबंधित स्टार्टअप्स सुरु करून, अनेकांना रोजगार उपलब्ध कसा करून दिला. तसेच लेदर उद्योग कसा पर्यावरणपूरक आहे याविषयी के. पी. इंडस्ट्रीज च्या संचालिका डॉ. पद्मजा राजगुरू यांनी माहिती दिली. व तरुणींना व महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले.

'चॅम्पियन द चेंज-संवाद महिलांचा, महिलांसाठी' या उपक्रमास टाटा प्ले बिंज, जोस आलुक्कास, वूट, आणि हॅवेल्स यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. काश्यता भाटिया यांनी कार्यशाळेचे संचालन केले.

आज शनिवार ता. (१२) मार्च रोजी , सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत संपन्न होणाऱ्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेली लिंक व QR कोड ओपन करून रेजिस्ट्रेशन करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क :- ८७९३०६२०११

लिंक :- https://bit.ly/3vDee0q

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com