esakal | डिजिटल सातबारा उतारे काढण्याचा उच्चांक; भूमी अभिलेख विभागाच्या नावावर नवा विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Digital_Satbara

भूमी अभिलेख विभागाकडून यापूर्वीच ई-फेरफार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभागाशी संबंधित अनेक सुविधा या ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

डिजिटल सातबारा उतारे काढण्याचा उच्चांक; भूमी अभिलेख विभागाच्या नावावर नवा विक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागाने डिजीटल स्वाक्षरी असलेले सातबारा, फेरफार आणि खाते उतारे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल 52 लाखांहून अधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एक महिन्यात एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतल्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या नावावर नवा विक्रम नोंदविला गेला आहे. 

अखेर लडाखमधील सैन्य मागे; 'तो' वादग्रस्त भाग नवा बफर झोन म्हणून घोषित!​

भूमी अभिलेख विभागाकडून यापूर्वीच ई-फेरफार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभागाशी संबंधित अनेक सुविधा या ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा, फेरफार उतारा आणि खाते उतारा ऑनलाईन पद्धतीने शुल्क आकारून उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा देखील खात्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मागील तीन महिन्यात राज्यातील 41 लाख 11 हजार सातबारे उतारे, 20 लाख 16 हजार खाते उतारे आणि 2 लाख 1 हजार फेरफार उतारे ऑनलाईन पद्धतीने नागरिकांनी घेतले होते. 

तरुणांनो, 'या' १० क्षेत्रांत लाॅकडाऊनमध्येही मिळतेय नोकरीची संधी!​

परंतु जून महिन्यात हे रेकॉर्ड मोडले गेले. या एका महिन्यात महाभूमी पोर्टलवरून जवळपास 52 लाख 7 हजार 939 नागरिकांनी पंधरा रूपये शुल्क भरून डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे घेतले आहे. त्यातून राज्य सरकारला 2 कोटी 60 लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे. भूमी अभिलेख खात्याच्या इतिहासात हा विक्रम नोंदविला गेला आहे. खरीप पीक कर्ज, पीक विमा आणि विविध योजनांसाठी डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा कायदेशीर धरला जातो. त्यामुळे या कामांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या सुविधेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. 

खासदार डॉ. अमोल कोल्हे झाले होम क्वारंटाईन, कारण...​

डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारे , फेरफार आणि खाते उतारा ऑनलाइन नागरिकांना उपलब्ध करून देण्याची सुविधा विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांना मोठ्या संख्येने होत असल्याचे समोर आले आहे. जून महिन्यात 52 लाखाहून अधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. आजपर्यंत हा विक्रम आहे. 
- रामदास जगताप ( उपजिल्हाधिकारी- ई. फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक) 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात एकूण 2 कोटी 52 लाख संगणकीकृत सातबारा उतारे आहेत. त्यापैकी 2 कोटी 49 लाख सातबारा उतारे हे डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे आहे. त्यामुळे राज्यातील 99 टक्के सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे नागरीकांना घर बसल्या महाभूमी पोर्टलवर एका क्‍लिकवर उपलब्ध होत आहेत. 

नवा उच्चांक 
ई-फेरफार प्रकल्पातंर्गत फेरफार उताऱ्यावर देखील ऑनलाइन नोंदी घेण्याचे काम केले जाते. दर महिन्याला या सुविधेच्या माध्यमातून सुमोर पावणे दोन ते दोन लाख फेरफार उताऱ्यावर नोंदी घातल्या जातात. मात्र जून महिन्यात ऑनलाइनच्या माध्यमातून तब्बल 3 लाख 13 हजार फेरफार उताऱ्यांवर नोंदी घालण्यात आला असल्यामुळे हा देखील नवा उच्चांक विभागाच्या नावावर नोंदविला गेला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image
go to top