esakal | अखेर लडाखमधील सैन्य मागे; 'तो' वादग्रस्त भाग नवा बफर झोन म्हणून घोषित!
sakal

बोलून बातमी शोधा

Indian_Army_Ladakh

३० जूनला भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरल रँक अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत गलवान व्हॅली, हॉट स्प्रिंग, पँगाँग त्सो आणि गोगरा या भागातील तणाव कमी करण्याबाबत चर्चा झाली.

अखेर लडाखमधील सैन्य मागे; 'तो' वादग्रस्त भाग नवा बफर झोन म्हणून घोषित!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लेह : चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लडाखमधील वादग्रस्त जागेवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ते आता मावळू लागल्याचे दिसत आहे. कारण दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेतले आहे. लडाखमधील हॉट स्प्रिंग पेट्रोल पॉइंट १५ पासून भारत आणि चीनने आपले सैन्य २ किलोमीटरपर्यंत मागे घेतले आहे. तसेच गोगरा पेट्रोल पॉइंट १७ए पासूनही शुक्रवारपर्यंत सैन्य मागे हटविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

नेहरुंच्या लडाख भेटीचा दाखला देत शरद पवार म्हणाले, 'PM मोदींनी...'​

मिळालेल्या माहितीनुसार, पँगाँग लेकजवळील फिंगर-४ भागात चीनी सैन्याच्या हालचाली दिसत आहेत. या भागातून चीनने आपली वाहने आणि रणगाडे हटविली आहेत. मात्र, काहीप्रमाणात सैन्य अजूनही त्या ठिकाणी असल्याने पेट्रोलिंग करण्यात भारतीय सैन्याला अडथळे येत आहेत. पहिल्यापासून फिंगर-४च्या पुढील काही भागापर्यंत भारतीय सैन्य पेट्रोलिंग करत आहे. 

अद्भूत ! चक्क ११८ वर्षांनंतर ‘ही’ दुर्मिळ वनस्पती भारतात सापडली

३० जूनला भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरल रँक अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत गलवान व्हॅली, हॉट स्प्रिंग, पँगाँग त्सो आणि गोगरा या भागातील तणाव कमी करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार, सोमवारी (ता.६) गलवान भागातून चीनने आपल्या सैन्याला पाठमागे जाण्याच्या सूचना केल्या. आता हॉट स्प्रिंग भागातील सैन्यही दोन किलोमीटर मागे घेण्यात आले असून दोन्ही देशांच्या जवानांनी हा भाग बफर झोन म्हणून जाहीर केला आहे. 

गांधी कुटुंबाला मोठा झटका; तपासासाठी सरकारनं नेमली समिती​

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी चीनच्या स्टेट काउंन्सिलर वांग यी यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी एलएसी (वास्तविक नियंत्रण रेषा) आणि पूर्व लडाख येथे दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेला वाद चर्चेद्वारे सोडविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

loading image
go to top