Corona Virus : धक्कादायक ! पुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी झाला असून दीनानाथ रुग्णालयात ५२ वर्षांचा पुरूषचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता.  त्यास कोणापासून संसर्ग याची निश्चित aमाहिती अद्याप सरकारला मिळाली नाही. 
 

पुणे : पुण्यात कोरोनाचा पहिला बळी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी झाला असून दीनानाथ रुग्णालयात ५२ वर्षांचा पुरूषचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता.  त्यास कोणापासून संसर्ग याची निश्चित माहिती अद्याप सरकारला मिळाली नाही. 

जगातील पहिली घटना; अमेरिकेत कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू

दरम्यान,  कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या देशात १ हजार २२४तर राज्यात २१५ वर पोहचली आहे. केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात ३० रुग्णांचा मृत्यू  झाला आहे तर, राज्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.  मुंबई ७, पुण्यात - १ , बुलढाण्यात १ अशी मृतांची संख्या आहे. 

जगभरातील मृतांची संख्या वाढली; युरोपमध्ये सर्वाधिक 21 हजार मृत्यू
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 52 years man becomes the first victim of Coronavirus in Pune