ट्रकमधील 55 लाखांची विदेशी दारु लुटली

श्रीकृष्ण नेवसे
शुक्रवार, 25 मे 2018

सासवड (पुणे) : खळद (ता. पुरंदर) हद्दीत गोटेमाळ येथे ट्रक अडवून सुमारे 55 लाख 33 हजार 14 रूपये किंमतीचे विदेशी दारूचे 924 बाॅक्स लुटले. दोन दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी चोरटय़ांनी चालकास मारहाण करून ही लुटमार केली.

याबाबत ट्रक चालक मुकेश अशोककुमार गुप्ता  (वय 33, रा. अंबानी,  भिवंडी, मुल रा. बिहार) यांनी सासवड पोलीसांकडे आज फिर्याद दिली. ही घटना मंगळवारी (ता. 22) रात्री व बुधवारी (ता. 23) सकाळी साडेआठच्या दरम्यान घडली. मात्र काल (ता. 24) सायंकाळनंतर सासवड पोलीस ठाण्यात कागदपत्रांसह चालकाने फिर्याद दाखल केली.  

दोन दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी चोरटय़ांनी ट्रक (एमएच 12 ईक्यू 2618 ) बुधवारी रात्री दुचाकी आडवी लावून अडविले. चालकास मारहाण करून टाॅवेलने बांधले. तसेच ट्रक  पुण्यानजिक वाकड-ताथवडे येथे नेला. तिथे विदेशी दारूचे सर्व बाॅक्स चोरट्यांनी लुटले. सुमारे 55 लाख 33 हजार 14 रूपये किंमतीचे विदेशी दारूचे हे 924 बाॅक्स होते. प्रत्येक बाॅक्समध्ये 180 मिली. च्या 48 बाटल्या होत्या. म्हणजेच एकुण दारूच्या 44,352 बाटल्या लुटल्या गेल्या. लोणंदच्या कंपनीतून ह्या 'इम्पेरीयल ब्ल्यू व्हिस्की' प्रकारातील दारूच्या बाटल्या बाहेर पुरवठ्यासाठी चालल्या होत्या. आज सासवड पोलीसांकडे फिर्याद दिल्यावर.. पोलीस डीवायएसपी अण्णासाहेब जाधव, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. 

Web Title: 55 lacks branded liquor steal from truck