IMF ची भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'गुड न्यूज', चीनलाही टाकणार मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

imf

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी (Indian Economy) चांगले संकेत दिले आहेत

IMF ची भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'गुड न्यूज', चीनलाही टाकणार मागे

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी (Indian Economy) चांगले संकेत दिले आहेत. आर्थिक वर्ष 2021-21 मध्ये भारताची अर्थव्यवस्था दोन अंकी विकास (Double Digit Growth) दर गाठेल, असा अंदाज आयएमएफने लावला आहे. अंदाज लावण्यात आलाय की, भारताची अर्थव्यवस्था 11.7 टक्के गतीने वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलंय की, कोरोनाच्या संकटात भारत एकटा देश असेल जो इतक्या गतीने आर्थिक वृद्धी प्राप्त करेल. विशेष म्हणजे पुढील आर्थिक वर्षी भारताची अर्थव्यवस्था चीनसह इतर अनेक देशांच्या आर्थिक वृद्धीला मागे टाकेल. 

Farmer Protest: दिल्ली हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून शेतकऱ्यांविरोधात 15 FIR

चीन 8.1, स्पेन 5.9 टक्के विकास दर गाठेल

आयएमएफकडून जारी करण्यात आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलूकमध्ये भारतीय अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात चांगली कामगिरी करणार आहे. दुसरीकडे, 2020 मध्ये कोरोना महामारीच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये घसरण झाली होती. पण, देश आता सावरत असून येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्था मजबुत स्थितीत येणार आहेत. आयएमएफच्या अंदाजानुसार, चीन 8.1 टक्के आर्थिक विकास दर गाठू शकतो, तर स्पेन (Spain) 5.9 टक्के आणि फ्रान्स (France) 5.5 टक्के आर्थिक विकास दर गाठेल.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंगळवारी म्हटलं की, भारताची वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये गणना होईल. गेल्या तीन महिन्यांत काही देशांनी कोरोनावरील लस तयार करण्यात मोठे यश मिळवलं आहे. अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे अनेक देशात सकारात्मक वातावरण पाहायला मिळणार असल्याचं आएएमएफने म्हटलं आहे. 

मुस्लिम राष्ट्रात दिमाखात उभा राहणार भव्य हिंदू मंदिर

आईएमएफ ने 2021 साठी जागतिक अर्थव्यवस्थेचा अंदाज 5.5 टक्के दाखवला आहे, जो ऑक्टोबर 2020 मधील अंदाजापेक्षा 0.3 टक्के जास्त आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलंय की, 2021 मध्ये काही देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरु झाल्याने त्याचा चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. अमेरिका आणि जपानसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये 2020 च्या शेवटापासून वृद्धी पाहायला मिळाली आहे. 

loading image
go to top