esakal | चिकाटी, जिद्द व प्रामाणिकपणाच्या जोरावर फुलवली शेती, झाली लाखोंची बरसात
sakal

बोलून बातमी शोधा

चिकाटी, जिद्द व प्रामाणिकपणाच्या जोरावर फुलवली शेती, झाली लाखोंची बरसात

-चिकाटी, जिद्द व प्रामाणिकपणाच्या जोरावर फुलवली १० एकर शेती
-एक एकरामध्ये डाळिंबमधून मिळविले ६ लाख रुपयांचे उत्पन्न

चिकाटी, जिद्द व प्रामाणिकपणाच्या जोरावर फुलवली शेती, झाली लाखोंची बरसात

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर : १९७२ च्या दुष्काळामध्ये गाव सोडून गेलेल्या  खोरोची (ता. इंदापूर) येथील संभाजी विठ्ठल भाळे यांनी चिकाटी, जिद्द व प्रामाणिकपणाच्या जोरावर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन दहा एकरातील शेती फुलवली असून एक एकर डाळिंबच्या पिकातून ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

१९७२ सालच्या दुष्काळामध्ये भाळे यांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:चे खोरोची सोडून सणसर गावामध्ये २३ वर्ष राहावे लागले. सुरवातीला पत्नी नागरबाई यांच्या उसतोडणी कामगार म्हणून काम केले. नंतरच्या तब्बल २० वर्ष त्यांनी  सणसर व भवानीनगर  परीसरातील शेतकऱ्यांच्या उसाची कुदळीच्या साहय्याने खांदणी व बांधणीचे काम केले. कष्टाने कमविल्या पैशातून स्वत:च्या मूळ गावी खोरीचीमध्ये तीन एकर जमीन खरेदी केल्याने त्यांच्याकडे पाच एकर झाली.१९८० च्या काळामध्ये खोरोची गावामध्ये नीरा नदीवरती कोल्हापूरी पद्धतीचा  बांधलेल्या बंधाऱ्याचा भाळे यांना ही फायदा झाला. नदीचे पाणी पाइपलाइन आणले. स्वत:ची शेती त्यांना खुणवू लागल्याने २३ वर्षानंतर १९९५ साली सणसर गाव सोडून खोरोची या मुळ गावी परतले. शेतीबरोबर दुग्धव्यवसाय सुरु केला.२००२ साली सुरु केलेला डेअरी व्यवसाय आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

क्षमता १२०० प्रवाशांची अन्‌ प्रवास केला फक्त १५ प्रवाशांनी

बदलत्या काळानूसार भाळे कुंटूबाने शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. आगामी काळामध्ये शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून नव्याने १ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे केले आहे. तसेच १० एकर क्षेत्रापैकी यापूर्वी ३ एकर क्षेत्र ठिबक सिंचनवरती होते. मात्र उर्वरित क्षेत्राला ठिंबक सिंचन करण्याचे काम सुरु आहे. तसेच विद्युत पंप ही मोबाइल वरुन चालू- बंद करीत असून शेतामध्ये सीसीटीव्ही बसवले आहेत. दररोज घरामध्ये बसूनही शेतीवर नजर ठेवणे सहज शक्य होत आहे. भाळे हे दुसऱ्याच्या शेतामध्ये कुदळीच्या साहय्याने उसाची खांदणी, बांधणी करणारे आज आज ते स्वत:च्या शेतामध्ये उसाची मशागत कुदळीऐवजी यांत्रिक अवजारांचा वापर करुन करीत आहेत.

जंबो कोविड सेंटरमधील तंबू अग्निरोधक 

डाळिंबाने केले मालामाल...
तीन वर्षापूर्वी लागवड केलेल्या डाळिंबाच्या बागेमध्ये मार्च महिन्यामध्ये डाळिंबाचा नव्याने बहार धरला.चालू वर्षी तालुक्यामध्ये विक्रमी पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांची डाळिंबाच्या बागांचे नुकसान झाले असून शेतकरी उद्धवस्थ झाले आहेत.मात्र  भाळे यांना डाळिंबाने मालामाल केले.एक एकरामध्ये १३ टन डाळिंबाचे उत्पादन घेतले.  डाळिंबाला प्रतीनूसार ४५ ते ६७ रुपयांचा दर मिळाला असून सहा लाख रुपयांचे उत्पन्न विक्रमी उत्पादन मिळाले असून यासाठी मुलगा दादासाहेब भाळे, सून वर्षा भाळे यांनीही परिश्रम घेतले.

सोनाईने केले आयुष्याचे सोने...
२००२ च्या सुमारास सुरु केलेला दुध डेअरी व्यवसाय आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. १२० लिटरवरती सुरु केलेली डेअरी आज ४ हजार लिटरवर पोहचली आहे.  सोनाई मुळे आमच्या आयुष्याचे सोने झाल्याची प्रतिक्रिया संभाजी भाळे व दादासाहेब भाळे यांनी दिली असून भाळे यांनी घराचे नाव ही सोनाई-विठ्ठल निवास ठेवले आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

loading image