Pune Crime : आरटीओतील दलालाकडून सहाजणांना साडेसात लाखांना गंडा

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काम करून देण्याचे आमिष दाखवून दलालाने सहाजणांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक
6 people were cheated of seven lakhs by broker in RTO crime news pune
6 people were cheated of seven lakhs by broker in RTO crime news puneesakal
Updated on

Pune News : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काम करून देण्याचे आमिष दाखवून दलालाने सहाजणांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दलालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिलिंद मधुकर भोकरे (रा. स्वारगेट) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी युवराज भिवाजी टकले (वय ४२, रा. रोहन अभिलाषा सोसायटी, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टकले यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीचा खासगी वापर करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जुलै महिन्यात अर्ज दिला होता. आरटीओ कार्यालयातील सर्व प्रक्रिया करून देतो,

असे सांगून भोकरेने टकले यांच्याकडून एक लाख ४५ हजार रुपये घेतले. त्यांच्याकडून वाहनाची कागदपत्रेही घेतली. परंतु त्यांचे काम न करता पैसे देण्यास टाळाटाळ केली. याबाबत टकले यांनी पोलिसांत तक्रार दिली. चौकशीदरम्यान, भोकरेने टकले यांच्यासह इतर पाच जणांची सात लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com