पुणे-निजामुद्दीनदरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पुणे - नाताळ आणि नव्या वर्षानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने पुणे ते हजरत निजामुद्दीन मार्गावर सहा विशेष साप्ताहिक एसी गाड्या सुरू केल्या आहेत. येत्या मंगळवारपासून (ता. २५) १० जानेवारीपर्यंत या गाड्या सुटणार आहेत. या मार्गावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेत या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सहा गाड्यांपैकी तीन गाड्या पुणे रेल्वे स्थानकातून; तर तीन हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून सुटणार आहेत. या गाड्या १७ डब्यांच्या असून लोणावळा, कल्याण, वाशी रोड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा आणि मथुरा या स्थानकांवर थांबणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण सोमवारपासून (ता.

पुणे - नाताळ आणि नव्या वर्षानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने पुणे ते हजरत निजामुद्दीन मार्गावर सहा विशेष साप्ताहिक एसी गाड्या सुरू केल्या आहेत. येत्या मंगळवारपासून (ता. २५) १० जानेवारीपर्यंत या गाड्या सुटणार आहेत. या मार्गावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेत या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सहा गाड्यांपैकी तीन गाड्या पुणे रेल्वे स्थानकातून; तर तीन हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून सुटणार आहेत. या गाड्या १७ डब्यांच्या असून लोणावळा, कल्याण, वाशी रोड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा आणि मथुरा या स्थानकांवर थांबणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण सोमवारपासून (ता. २४) करता येणार आहेत.

Web Title: 6 Special Train for Pune Nijamuddin