बासष्ट लाखांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

निगडी - शहरातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पीएमपीएमएल मधून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी नाही. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षात अशा तीस हजार प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून बासष्ट लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. फुकट्या प्रवाशांच्या विरोधात पीएमपीएमएलने अधिक व्यापक मोहीम हाती घेतली आहे. 

फुकट्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी सप्टेंबरपासून दंडाची रक्कम तीनशे रुपये करण्यात आली. तेव्हापासून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. सप्टेंबरपूर्वी दंडाची रक्कम शंभर रुपये होती.

तिकीट तपासणीसांचे काम तीन पाळ्यांमध्ये चालत असले, तरी त्यांची संख्या कमी असल्यामुळे फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यास मर्यादा येत आहेत. पीएमपीच्या सर्व मार्गांवर तपासणीसांचे भरारी पथक काम करीत आहे. सप्टेंबरपासून दंड वाढवल्यानंतर सात महिन्यांत साधारण चौदा हजार फुकटे प्रवासी पकडण्यात आले. तत्पूर्वी पाच महिन्यांत सोळा हजारांहून अधिक विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी पकडण्यात आले होते, असे सांगण्यात आले.

वर्षभरात विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी - ३०,१०४
त्यांच्याकडून दंडापोटी वसूल केलेली रक्कम - ६२,१५,९००
तिकीट तपासनीस - १०२
वरिष्ठ अधिकारी - २०
तपासनीसांच्या शिफ्टची संख्या - ३

प्रशिक्षित तिकीट तपासणीसांची संख्या वाढवणे आवश्‍यक आहे. महिन्याचा पास आणि तिकीट तपासणी यापुढे अधिक कडक केली जाणार आहे. प्रवाशांनी नैतिकता पाळून विनातिकीट प्रवास करणे टाळावे.
- डी. बी. माने, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

Web Title: 62 lakh fine recovery