कुकडी प्रकल्पाचे लाभक्षेत्रातील ६५ कोल्हापुर बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश; अतुल बेनके

कुकडी प्रकल्पा अंतर्गत सिंचनाचे शेतकरी हिताचे निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
65 Kolhapur dams include in Kukdi project Atul Benke Narayangaon
65 Kolhapur dams include in Kukdi project Atul Benke Narayangaonsakal

नारायणगाव : कुकडी प्रकल्पाचे लाभक्षेत्रातील कुकडी, घोड व मीना नदीवरील ६५ कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करणे, डिंभे धरणातील पाणी पुणे जिल्ह्यासाठी संरक्षित ठेवण्यासाठी नियोजित डिंभे - माणिकडोह बोगद्याची डिंभे धरण पातळी पुर्ण संचय पातळी जवळ ठेवणे,डिंभे डावा कालव्याची दुरुस्ती तातडीने करणे यासह कुकडी प्रकल्पा अंतर्गत सिंचनाचे शेतकरी हिताचे निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आले. आशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली. कुकडी प्रकल्पासंबंधी प्रलंबित विविध अडचणी व मागण्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे बैठक झाली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ,जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतीत झाली. या वेळी आमदार रोहीत पवार, अतुल बेनके , मुख्य अभियंता ह. तु. धुमाळ, कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर आदी उपस्थीत होते. या बाबत आमदार बेनके म्हणाले मागील शासनाच्या काळात डिंभे - माणिकडोह बोगदा प्रकल्पाची डिंभे धरण बाजूकडील पातळी धरणाच्या तळाजवळ निश्चित करणेत आली होती.या मुळे डिंभे धरणातील पुणे जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी येडगाव धरणाकडे वळविण्याची भीती असल्याने या निर्णयाला गृहमंत्री वळसे पाटील, आमदार बेनके यांनी विरोध केला होता. डिंभे धरणातील उपयुक्त पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजित डिंभे माणिकडोह बोगद्याची डिंभे धरण पातळी पुर्ण संचय पातळी जवळ ७०९ मी तलांका जवळ ठेवणे बाबतचा सुधारित निर्णय घेण्यात आला. यामुळे डिंभे धरणा मधील जुन्नर, आंबेगाव व शिरुर तालुक्याच्या वाट्याचे पाणी सुरक्षित राहणार असुन अतिरिक्त पाण्याचा वापर अन्य ठिकाणी होणार असून माणिकडोह धरणातील पाणी साठा वाढणार आहे.

बैठकीत घेण्यात आलेले इतर निर्णय पुढीलप्रमाणे

● कुकडी प्रकल्पाचे लाभक्षेत्रातील कुकडी, घोड व मीना नदीवरील ६५ कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करणे.

●आदिवासी भागातील शेतीसाठी डिंभे धरणावरून कळमजाई, बोरघर व फुलवडे उपसा सिंचन योजना व डिंभे उजवा कालव्याच्या लाभक्षेत्राबाहेर लोणी धामणी (ता. आंबेगाव) प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन या योजनांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आला.

● डिंभे डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी २७.२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. डिंभे डावा कालवा दुरुस्तीसाठी वाढीव १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद २०२२-२३ बिगर सिंचन प्रापण सूचीमध्ये करावी.

● डिंभे उजवा कालव्याची उर्वरित कामे तसेच अस्तरीकरण कामासाठी ५० कोटी रुपये, उर्वरित भूसंपादनासाठी १०० कोटी रुपयांची व पिंपळगाव जोगे डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करावी.आवश्यक निधीची तरतूद २०२२-२३ च्या बांधकाम प्रापणसूचीमध्ये करणेबाबत निर्देश देण्यात आले.

●कुकडी उप खो-यालगत पश्चिमे कडे वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी पुर्वेकडे वळविण्यासाठीच्या वळण योजनांची सर्वेक्षणाची कामे तातडीने पुर्ण करुन वळण योजना हाती घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आले.

● कोपरे मांडवे ( ता. जुन्नर) येथे मांडवी बंधारा बांधणेसाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळणेच्या द्रुष्टीने पाणी उपलब्धतेचे फेर नियोजन करणेबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निर्देश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com