पुणे : ६५ वर्षाच्या नागरिकाचा स्माशानभूमीतच केला खून अन्...

65 year old citizens Murder in Hadapsar area Pune
65 year old citizens Murder in Hadapsar area Pune

हडपसर (पुणे) : ६५ वर्षाच्या नागरिकाचा स्माशानभूमीतच धक्कादायकरित्या दगड आणि विटांनी ठेचून खून करण्यात आला असून खून कोणी केला कशासाठी केला याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फुरसुंगी येथील स्मशानभूमीतच अज्ञात आरोपीकडून एका जेष्ठ नागरिकांच्या डोक्यात दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद?

नरसिंग विठ्ठल गव्हाणे ( वय ६५ रा.जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी, फुरसुंगी गाव, ता.हवेली,जि.पुणे) असे खून झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. गणेश नरसिंग गव्हाणे (वय ४०) या मृतांच्या मुलाने फिर्याद दिली आहे. याबाबत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात, 'गांभीर्यपूर्वक...

हडपसर पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग गव्हाणे हे फुरसुंगी येथे पत्नी, दोन मुले सुनासह राहतात, रविवारी रात्री आठ वाजता जेवण करून ते बाहेर फेरफटका मारण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र ते रात्री उशिरा पर्यंत घरी आले नाही. मात्र, सकाळी सात वाजता दशक्रिया विधीच्या जागेमध्ये नरसिंग याच्या डोक्यात दगडाने व विटाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. खून कोणी केला कशासाठी केला याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com