
पोर्टलवर प्राप्त अर्जाची ऑनलाइन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.
कोळवण : कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली असुन यात जिल्ह्यात ता. १२ जानेवारीपर्यंत ६५२५७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यांत सर्वाधिक अर्ज शिरुर तालुक्यातील असुन सर्वात कमी अर्ज वेल्हा तालुक्यातील आहेत. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते लाभ मिळेपर्यंत संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. या योजनेतंर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोर्टलवर प्राप्त अर्जाची ऑनलाइन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.
यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, लाभाच्या घटकांमध्ये शेतकऱ्यांना त्यात बदल करता येत होता. अर्ज दाखल करण्याची सुविधा सोपी असुन अर्ज दाखल करताना कोणत्याही कागदपत्रांची गरज लागत नव्हती. अर्जासाठी केवळ २३ रुपये ६० पैसे शुल्क होते. यात सर्वाधिक २२६६९ अर्ज ट्रॅक्टरसाठी असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी स्वप्निल ढमाले यांनी दिली.
राज्याच्या वेगवेगळ्या भागात लशीसाठी शीतगृहे सज्ज
बाबनिहाय अर्ज संख्या-
बैल चलित अवजारे-३२०, कृषी अवजारे बँक- ५८, उच्च तंत्रज्ञान, उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना- ३०, फलोत्पादन यंत्र अवजारे-२७६, मनुष्य चलित यंत्र- १८३३, कापणीनंतरचे तंत्रज्ञान यंत्र- ३४३, पॉवर टिलर-६८१६, प्रक्रिया उद्योग - १४९५, स्वयंचलित यंत्र -१०६०, विशेष कृषी यंत्र-१४७, ट्रॅक्टर - २२६६९, ट्रॅक्टर चलित अवजारे - ३०२१०.
सात ते आठ कोटी डोसची दरमहा निर्मिती - आदर पूनावाला
तालुकानिहाय अर्ज संख्या-
भोर-११२३, वेल्हा-३३६, मुळशी-४८२, मावळ-६९७, हवेली-१८२६, खेड-३४५९, आंबेगाव-३४४८, जुन्नर-७५५४, शिरुर-१२८३७, पुरंदर-३१८२, बारामती-९८३२, दौड-९२५५,
इंदापुर-१११२६.
(संपादन : सागर डी. शेलार)