esakal | पुण्यातील हे मोठे धरण दोन दिवसांत भरणार
sakal

बोलून बातमी शोधा

vir dam

नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून, दोन दिवसांत पुरंदर तालुक्यातील वीर धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरण 66 टक्के भरले असून, धरणात 6.5 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे.

पुण्यातील हे मोठे धरण दोन दिवसांत भरणार

sakal_logo
By
संतोष जंगम

परिंचे (पुणे) : नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून, दोन दिवसांत पुरंदर तालुक्यातील वीर धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरण 66 टक्के भरले असून, धरणात 6.5 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे.

प्रत्येक बारामतीकराची आजपासून होणार तयारी

दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नीरा नदी खोऱ्यातील धरण साखळी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाणलोट क्षेत्रात अनेक ओढ्याचे पाणी नदीपात्रात येत आहे. गुंजवणी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, वेळवंडी व कानंदी या नद्यांमधून मोठ्या प्रमाणात नीरा नदीपात्रात पाणी येत आहे. येणारा प्रवाह असाच सुरू राहिल्यास दोन दिवसात धरण शंभर टक्के भरणार असल्याचे सहायक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले.

न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांवर सुनवाई

वीर धरणात गुरुवारी (ता. 6) घेतलेल्या आकडेवारीनुसार 6.5 टीएमसी एवढा साठा असून, धरण 66 टक्के भरले आहे. भाटघर धरणात 13 टीएमसी इतका साठा असून, धरण 55 टक्के भरले आहे. नीरा देवघर धरणात 5 टीएमसी पाणीसाठा असून धरण 42.37 टक्के भरले आहे. सर्वात जास्त पाऊस गुंजवणी पाणलोट क्षेत्रात झाला असून, 2.5 टीएमसी इतका साठा असून, धरण 77 टक्के भरले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वीर धरण गेल्या वर्षी 11 जुलै रोजी 50 टक्के भरले होते. त्यानंतर 28 जुलै रोजी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. 5 ऑगस्ट रोजी धरणातून 1 लाख 2 हजार क्युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण सद्रिक यांनी सांगितले. या वेळी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संजय भोसले, संभाजी शेडगे, अरुण भोसले, लक्ष्मण भंडलकर आदी कर्मचारी उपस्थित होते. धरणाच्या उजव्या कालव्यातून 300 क्युसेक पाणी सोडण्यात येत असून, डावा कालवा बंद आहे.