डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्टस् असोसिएशनचे ६६ वे वार्षिक अधिवेशन पुण्यात

शेठ वालचंद हिराचंद यांनी १९३६ साली साखर उद्योगाशी संबंधित नवीन तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचावे, या उद्देशाने डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्टस् असोसिएशनची स्थापन करण्यात आली
Deccan Sugar Technologists Association
Deccan Sugar Technologists Associationsakal media

पुणे : डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्टस् असोसिएशनचे ६६ वे वार्षिक अधिवेशन पुण्यात ३० ऑक्टोबर रोजी ‘यशदा’ येथे होणार आहे. या अधिवेशनास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजन समितीचे प्रमुख सोहन शिरगावकर आणि असोसिएशनचे अध्यक्ष शहाजी भड यांनी दिली.

शेठ वालचंद हिराचंद यांनी १९३६ साली साखर उद्योगाशी संबंधित नवीन तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचावे, या उद्देशाने डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्टस् असोसिएशनची स्थापन करण्यात आली. या असोसिएशनच्या वतीने हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक सभासदांना निमंत्रित करण्यात आले आहे. इतर सर्व सभासदांना ऑनलाइन पद्धतीने परिषदेत सहभागी होता येईल.

या अधिवेशनात साखर कारखाने आणि संलग्न उद्योगाशी संबंधित शोध निबंधांचे सादरीकरण होणार आहे. साखर उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या संस्थांकडून उत्पादन, शेती, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या विषयांवर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यातील संस्थेच्या सभासदांकडून शोध निबंध मागवले जातात. त्यानंतर असोसिएशनच्या तज्ज्ञ समितीकडून त्याची छाननी केली जाते. त्यातील उत्तम शोध निबंधांचे एकत्रिकरण असलेल्या पुस्तिकेचे अनावरण होणार आहे. नावीन्यपूर्ण आणि यशस्वी संकल्पनांचा लाभ सर्व सभासदांना व्हावा, यादृष्टीने पुस्तिकेची निर्मिती केली जाते. यंदाच्या पुस्तिकेत एकूण ४२ शोध निबंधांचा समावेश असेल, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

अधिवेशनात साखर उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या असोसिएशनच्या सभासदांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, साखर उद्योगात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या योगदानाची दखल घेत त्यांना इंडस्ट्रिअल एक्सलंस पुरस्काराने गौरविले जाणार आहे. गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. याशिवाय गेल्या वार्षिक अधिवेशनातील शोध निबंध पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट १० शोध निबंधांना रोख बक्षीसे देण्यात येतील.

एम. एस. मराठे यांना मंगलसिंग सुवर्णपदक

सर्वोत्कृष्ट शोध निबंधासाठी दिले जाणारे मंगलसिंग सुवर्णपदक यंदा मुंबई साखर संघाचे माजी व्यवस्थापकीय संचालक एम. एस. मराठे यांना दिले जाणार आहे. मराठे यांनी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय बाबींविषयी लिहिलेल्या शोध निबंधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मराठे यांनी नॅशनल फेडरेशन ऑफ को- ऑप.शुगर फॅक्टरीज ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com