7 वर्षीय स्वानंदीने केला साडेपाच तासात सिंहगड सर

जनार्दन दांडगे
सोमवार, 30 एप्रिल 2018

लोणी काळभोर (पुणे) : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील स्वानंदी सचिन तुपे (वय ७) या मुलीने साडेपाच तासाचे ट्रेकिंग पूर्ण करून सिंहगड किल्ला सर केला. स्वानंदी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांची मुलगी आहे.

लोणी काळभोर (पुणे) : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील स्वानंदी सचिन तुपे (वय ७) या मुलीने साडेपाच तासाचे ट्रेकिंग पूर्ण करून सिंहगड किल्ला सर केला. स्वानंदी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांची मुलगी आहे.

सचिन तुपे यांना ट्रेकिंगची आवड असल्याने त्यांनी अनेक किल्ल्यांवर ट्रेकिंग केले आहे. तसेच वडिलांपाठोपाठ स्वानंदीलाही ट्रेकिंगची आवड निर्माण झाल्याने वयाच्या पाचव्या वर्षापासून तिने ट्रेकिंगला सुरुवात केली. मागील दीड वर्षापासून ती वडिलांसोबत प्रत्येक रविवारी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रामदरा शिवालय ते झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील ज्वाला मारुती मंदिरापर्यंतचे व सोनोरी (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीतील मल्हारगड पर्यंतचे ट्रेकिंग पूर्ण करते.

दरम्यान रविवारी (ता. 29) पिंपरी चिंचवड येथील अग्निशमन दलाचे जवान अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वानंदी सिंहगड किल्ल्याच्या ट्रेकिंगमध्ये सहभागी झाली होती. रात्री साडेअकरा ते सोमवारी (ता. 30) पाहटे पाच या वेळेत 19 किलोमीटरचे अंतर पार करून तिने सिंहगड किल्ला सर केला. या मोहिमेत तिच्या समवेत वडील सचिन तुपे, पंडित झेंडे व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. अगदी कमी वयामध्ये सिंहगड किल्ल्याचे ट्रेकिंग पूर्ण केल्याने स्वानंदीचे सोशल मिडीया व सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. दरम्यान पुढीच्या रविवारी स्वानंदी लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंग करणार असल्याची माहिती ट्रेकिंगचे मार्गदर्शक अनिल वाघ यांनी दिली.

Web Title: 7 years old swanandi treks on sinhagad in 5 and half our