सातशे मिळकतींना ‘टाळे’

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - मिळकतकराची थकबाकी न भरलेल्या सुमारे सातशे मिळकतींना महापालिकेने टाळे ठोकले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण त्या ताब्यात घेण्याची कार्यवाही महापालिकेकडून केली जाण्याची शक्‍यता आहे. दोन महिन्यांत ही कारवाई केली असून, त्यात व्यावसायिक मिळकतींचा सर्वाधिक समावेश आहे. दुसरीकडे, चालू आर्थिक वर्ष संपण्यास पंधरा दिवस राहिले असतानाच केवळ अकराशे कोटींचा मिळकतकर जमा झाला आहे. 

दरम्यान, पंधरा दिवसांत आणखी दीडशे ते दोन कोटींचा महसूल जमा होईल. थकबाकी प्राधान्याने वसूल करीत आहोत, असे मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. 

शहर आणि उपनगरांमध्ये सुमारे सव्वाआठ लाख निवासी आणि व्यावसयिक मिळकती आहेत. चालू आर्थिक वर्षात या मिळकतींमधून सुमारे १ हजार ८१० कोटींच्या उत्पन्नांचे उद्दिष्ट या विभागाला दिले आहे. मात्र किमान पंधराशे कोटी मिळतील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र अकराशे कोटींचा आकडा गाठण्यात महापालिकेला यश मिळाले आहे. मिळकतकरातून हमखास उत्पन्न मिळत असल्याने महापालिका प्रशासन आणि स्थायी समितीने अर्थसंकल्पात या विभागाच्या उत्पन्नात वाढ केली आहे. परंतु वर्षभर वसुलीची मोहीम राबवूनही अपेक्षित महसूल मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

थकबाकी वसुलीवर भर दिला आहे. ती न भरणाऱ्या मिळकतदारांना नोटिसा बजावल्या. तरीही काणाडोळा केलेल्या मिळकतींना ‘सील’ करण्याची कारवाई केली. नोटिशीनंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. बहुतांशी व्यावसायिक मिळकतींची थकबाकी भरण्यासाठी मिळकतदार पुढे येत नाहीत.
- विलास कानडे, प्रमुख, मिळकतकर विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com