वडगावशेरीतील मतदार यादी शुध्दीकरणात ७० हजार नावे रद्द

५ ॲाक्टोंबर पर्यंत नविन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करता येणार
मतदार यादी
मतदार यादीsakal

येरवडा: वडगावशेरी मतदार संघातील मतदार यादी शुध्दीकरण अंतर्गत छायाचित्र नसलेले व दुबार नावे असलेले तब्बल ७० हजार मतदारांची नावे रद्द होणार आहे. ५ ऑक्टोंबर पर्यंत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करणे, मतदार यादीतुन नाव कमी करणे, नावात, पत्त्यात, वयात दुरूस्ती करणे, मतदार ओळख पत्र मिळण्यासाठी अर्ज करणे, मतदार संघ बदलणे अथवा स्थलांतर करणे शक्य होणार आहे. त्यानंतर १ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा महापालिका उपायुक्त संदिप कदम यांनी दिली.

कदम म्हणाले, ‘‘ राज्यातील विधानसभा मतदार संघातील मतदार यादी शुध्दीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या अंतर्गत मतदार संघातील दुबारा मतदार असलेल्यांची नावे वगळण्यात येत आहेत.यासह मतदार ओळखपत्रात अनेकांची छायाचित्र नाहीत ते घरोघरी जाऊन त्याची शहानिशा करीत आहोत. वडगावशेरी मतदार संघात तब्बल ६८ हजार मतदारांची छायाचित्र नाहीत. तर दोन हजार २५२ मतदारांची नावे दुबारा आहेत. त्यामुळे मतदार शुध्दीकरण अंतर्गत ही सर्व नावे वगळण्यात येणार आहेत.’’

मतदार यादी
"भारताशिवाय दहशतवाद, तापमानवाढ, लोकसंख्यावाढ यांवर तोडगा अशक्य"

अनेक नागरिक कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुढे येतात. ही सकारात्मक बाब आहे. मात्र कुटुंबातील सदस्य मृत्यू झाल्यास, स्थलांतर अथवा मुलींचे विवाह झाल्यास ही नावे वगळण्यात सात क्रमाकांचा अर्ज भरत नाही. त्यामुळे मतदार यादी वाढत जाते. त्याचा परिणाम प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे नागरिकांनी नावे वगळण्यासाठी सुध्दा अर्ज करणे आवश्‍यक असल्याचे कदम यांनी सांगितले.

नविन मतदान कार्ड कसे काढाल

नविन मतदान कार्ड काढण्यासाठी www.nvsp.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरणे आवश्‍यक आहे. मतदार यादी शुध्दीकरण अंंतर्गत मतदारांची नविन छायाचित्र टाकता येतात. अर्ज क्रमांक ६- मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी आहे. अर्ज क्रमांक ७ उपयोग मतदार यादीतुन नाव कमी करणे, मतदार मृत्यू, स्थलांतर अथवा विवाहीत मुली असल्यास करता येतो. अर्ज क्रमांक आठ मध्ये नावात, पत्त्यात, वयात दुरूस्ती तर मतदार ओळखपत्र मिळण्यासाठी उपयोगात येतो. तर अर्ज क्रमांक ८ अ राज्यातील कोणत्याही मतदार संघातील नाव आपल्याला पाहिजे असलेल्या मतदार संघात समाविष्ट करता येत असल्याची माहिती नायब तहसिलदार स्मिता कुलकर्णी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com