Pune | ७२ वा भारतीय संविधान दिवस बोपोडी-औंध येथे उत्साहात संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

७२ वा भारतीय संविधान दिवस बोपोडी-औंध येथे उत्साहात संपन्न
७२ वा भारतीय संविधान दिवस बोपोडी-औंध येथे उत्साहात संपन्न

७२ वा भारतीय संविधान दिवस बोपोडी-औंध येथे उत्साहात संपन्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रेंजहिल्स - बोपोडी-औंध येथे ७२ व्या भारतीय संविधान दिवसानिमित्त पुण्याच्या उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर व रिपाई नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या वतीने संविधान सन्मान सायकल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

या सायकल मार्चची सकाळी ७:०० वाजता सम्यक विहार व विकास केंद्र बोपोडी येथून सुरुवात होऊन ब्रेमेन चौक-डि. पी. रोड, औंध येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन नागरस रोड मार्गे-माता रमाबाई आंबेडकर शाळा, चिखलवाडी-राजेंद्रप्रसाद शाळा बोपोडी -राजर्षी शाहू महाराज चौक बोपोडी येथे संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून समारोप करण्यात आला.

समारोपप्रसंगी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, रिपाई नेते परशुराम वाडेकर, रिपाई शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, रिपाई शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम, रिपाई शिवाजीनगर युवक अध्यक्ष महादेव साळवे, भिमा गायकवाड, संतोष खरात, निलेश वाघमारे, भिमराव वाघमारे, राजेंद्र शिंदे, योगेश गायकवाड व रॅलीमधील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, बारा बलुतेदार सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक वर्ग व नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात काँग्रेस स्वबळावर लढणार : नाना पटोले

याप्रसंगी बोलताना नेते परशुराम वाडेकर म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्याही जातीपातीचा भेदभाव न करता सर्वसमावेशक विचार करून संविधान लिहिले. भारतीय संविधान हे लोकशाहीचा आत्मा असून संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या मूलभूत हक्कांवर भरीव अशी तरतूद केली आहे. संविधान हे भारतीय स्त्रियांना मिळालेली बहुमुल्य देणगी आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (आठवले) सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. ज्ञानेश जावीर यांनी केले.

loading image
go to top