७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४  हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४  हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर दरम्यान मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. प्रवासाचे तिकीट योग्य पद्धतीने न घेणे, जवळच्या प्रवासाच्या तिकिटात लांबच्या अंतराचा प्रवास करणे, याबाबतही तपासणी झाली. एकूण एक लाख ६३ हजार ५९४ प्रकरणांत ८ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. विनातिकीट प्रवाशांमध्ये गेल्यावर्षी याच कालावधीत १ लाख ३८ हजार प्रकरणांत ७ कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहव्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पथकांनी ही कारवाई केली. 

Web Title: 74 thousand non-ticket passengers in 7 months