पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ७६६ कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

पुणे - नियोजित चोवीस तास समान पाणीपुरवठा योजना, भामा आसखेड प्रकल्प, पर्वतीतील पाचशे अब्ज घनफूट (एमएलडी) क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती-लष्कर बंद जलवाहिनीच्या कामांना गती देऊन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन महापालिकेच्या अर्थसंकल्पात केले आहे. पाणीपुरवठ्याच्या विविध योजनांसाठी सुमारे ७६६ कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. 

पुणे - नियोजित चोवीस तास समान पाणीपुरवठा योजना, भामा आसखेड प्रकल्प, पर्वतीतील पाचशे अब्ज घनफूट (एमएलडी) क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती-लष्कर बंद जलवाहिनीच्या कामांना गती देऊन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन महापालिकेच्या अर्थसंकल्पात केले आहे. पाणीपुरवठ्याच्या विविध योजनांसाठी सुमारे ७६६ कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. 

दरम्यान, चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्‍यांची कामे पुन्हा सुरू होतील. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. टाक्‍यांच्या कामांना दोन दिवसांत परवानगी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. 

चोवीस तास पाणीपुरवठा योजने अंतर्गत विविध भागांत ८२ पाण्याच्या टाक्‍या उभारण्याचे नियोजन केले आहे. तसेच, नव्याने सुमारे १ हजार ६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिका, ‘स्मार्ट सिटी’ आणि अमृत योजनेतून सुमारे एक हजार कोटी रुपये उपलब्ध होतील. उर्वरित २ हजार २६४ कोटी कर्जरोखेच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत. तसेच, पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात पाचशे (एमएलडी) क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्राचे काम येत्या जूनमध्ये पूर्ण करणार आहे. त्यासाठी आवश्‍यक तेवढ्या निधीची तरतूद आहे. पर्वती ते लष्करपर्यंत सुमारे २२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून, तेही लवकर पूर्ण होणार आहे.  

शहराच्या पूर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आखलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे काम सध्या बंद आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून १२० कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रकल्पाचे काम बंद असल्याने केंद्राचा निधी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. मात्र, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे कुणाल कुमार यांनी सांगितले. मात्र, केंद्राचा निधी घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही ते म्हणाले. 

४३१ कोटी २४ तास पाणीपुरवठा

५० कोटी पर्वती जलशुद्धीकरण केंद्र
१५० कोटी भामा-आसखेड योजना
५० कोटी पर्वती-लष्कर बंद जलवाहिनी
८५ कोटी पावसाळी वाहिन्या

Web Title: 766 caror for water supply