59 ग्रा.पं. निवडणुकीसाठी 796 उमेदवार रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुणे - जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमधील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्यासाठी 796 उमेदवार रिंगणात आहेत. तर सरपंचपदाच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. 

पुणे - जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमधील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्यासाठी 796 उमेदवार रिंगणात आहेत. तर सरपंचपदाच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. 

ऑक्‍टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी 26 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल. जिल्ह्यात वेल्हे, भोर, पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ आणि मुळशी तालुक्‍यांतील 59 ग्रामपंचायतींसाठी 1311 जणांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्याची माघार घेण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर होती. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. एकूण नामनिर्देशनपत्रांपैकी 1285 अर्ज वैध ठरले असून, 26 अर्ज अवैध ठरविले आहेत. तर 489 जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता 796 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

सरपंचपदाच्या 59 जागांसाठी 300 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. त्यापैकी 296 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर 152 जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 144 उमेदवार सरपंचपदाची निवडणूक लढवीत आहेत. तसेच वेल्हे, भोर आणि खेड तालुक्‍यातील सरपंचपदाच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक होत असल्याची माहिती तहसीलदार विकास भालेराव यांनी दिली. 

Web Title: 796 candidates for the gram pancyat elections