esakal | पुण्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव; ब्रिटनहून आलेला एक जण पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh_Tope

कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळून आल्याने गेल्या आठवड्यात जगभरातील महत्त्वाच्या देशांनी आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली होती.

पुण्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव; ब्रिटनहून आलेला एक जण पॉझिटिव्ह

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : ब्रिटनहून भारतात परतलेल्या ८ प्रवाशांना नव्या कोरोना स्ट्रेनची लागण झाल्याचे आढळून आले. या ८ प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने महाराष्ट्रात एन्ट्री मारली आहे.   

सोमवारी (ता.४) ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नव्या कोरोनाची लक्षणे आढळून आली. यापैकी मुंबईतील ५ जणांचा समावेश असून पुणे, ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या सर्वजणांना क्वॉरंटाइन करण्यात आलं असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

Video: 'हाफ चड्डी घालून नागपूरात खोटी भाषणं करणं हा राष्ट्रवाद नाही'; सचिन पायलट यांनी डागली तोफ

कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळून आल्याने गेल्या आठवड्यात जगभरातील महत्त्वाच्या देशांनी आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली होती. ब्रिटनकडे जाणारी आणि ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर विमान वाहतुकीबाबतचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. 

हुंड्यासाठी सासरचे करायचे छळ; जीवनाला कंटाळून विवाहितेनं घेतला गळफास​

ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. सर्व प्रवाशांची तपासणी विमानतळावरच केली जात होती. तसेच त्यांच्यासाठी विशेष क्वॉरंटाइन सेंटर राखीव ठेवण्यात आली होती. नव्या स्ट्रेनची बाधा झालेल्या काहीजणांना विमानतळावरूनच हलविण्यात आलं होतं. तसेच ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, त्यांनाही काही दिवसांसाठी घरीच क्वॉरंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image