विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी नोंदवले 8 पेटंट

8 patent register by the students of vidya Pratishthan Kamal Nayan Bajaj institute
8 patent register by the students of vidya Pratishthan Kamal Nayan Bajaj institute

बारामती : येथील विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थी, प्राध्यापक व उप-प्राचार्य यांनी एकाच दिवशी आठ पेटंट नोंदविण्याचा विक्रम केला आहे. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप-प्राचार्य  डॉ. सुधीर लांडे यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने विविध समाजपयोगी विषयांवर संशोधन करून पेटंट नोंदणी ची प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली.

या संशोधनात डॉ. सुधीर लांडे, विनय नगलकर, ज्योती रंगोले व बाळासाहेब पाटील या शिक्षकांबरोबर ऐश्वर्या फुलारी, वैजनाथ खोमणे, ऋषीकेश काळे, निवृत्ती कदम, पूनम पवार, वैष्णवी विधाते, समता सुरवसे, श्रद्धा राजे, अनिकेत होले, प्रतिक्षा गायकवाड, सौरभ काळेबेरे, निर्मल कुंभार, पूनम जाधव, वैष्णवी कानडे, चैतन्य साबळे, शुभम हणमंते, संकेत अर्डे, शिवप्रिया यादव, पायल यादव, स्वानंद खळदकर, माऊली शिंदे, मयुर शिंदे, इलक्किया सुंदरम, शुभांगी खुसपे, नीलम कळसकर, शोभा कुचेकर हे विद्यार्थी सहभागी होते. 

संस्थेचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव द.रा. उंडे, खजिनदार रमणिक मोता, विश्वस्त सुनेत्रा पवार, अँड. नीलीम गुजर, डॉ. राजीव शहा, श्रीकांत सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांनी सर्वांचे अभिनंदन केले. 

काय आहेत पेटंट?
1. लो कॉस्ट अँग्रो फ़ॉरेस्टरी प्लॅन्ट सिक्युरिटी सिस्टीम यूजिंग पीआयसी माइक्रो कंट्रोलर -- या संशोधनात एक किट तयार केले असून ते झाडावर बसवल्यास वृक्षतोड होत असताना झाडावरील आघातांमुळे  झाडात तयार झालेली कंपने मालकास  मोबाईलवर संदेश  देतात. अनधिकृत वृक्षतोडीसारख्या  घटनेस आळा बसेल. 

2. नेक्स्ट जनरेशन हिटिंग अँड लोकेशन आयडेंटीफायर जॅकेट फॉर मिलिटरी पर्सनल - सियाचीन सारख्या अतिशीत प्रदेशात कार्यरत  सैनिकांची गरज लक्षात घेऊन उष्णता निर्माण करणारे आणि ती नियंत्रीत करता येणारे जॅकेट बनवले आहे. यात एक जिपीएस ट्रॅकर  बसवण्यात आला आहे. याबरोबरच सैनिकाच्या शरीराचे तापमान व वातावरणातील तापमान आणि आर्द्रता हे देखील जैकेट वरील डिस्प्ले वर दाखवण्याची सुविधा आहे. भारतीय सैन्यदलात उपलब्ध असलेल्या इतर जँकेट पेक्षा याचे वजन कमी आहे.

3. इझी केअर स्मार्ट वॉटर बॉटल फॉर नेक्स्ट जनेशन - या स्मार्ट बॉटल मधे बर्फाळलेले पाणी 65 डिग्री सेल्सीयस पर्यंत तापवण्याची क्षमता असून बाटलीतील पाण्याचे तापमान दाखवणारा डिस्प्ले, प्रत्येक तासाला पाणी पिण्याचा अलार्म, शॉकप्रूफ बॉडी  सुविधा आहेत.

4. इलेट्रीकल अप्लायन्सेस मॉनिटरिंग अँड सेव्हर डिव्हाईस फॉर इन्स्टिट्यूशन - यात महाविद्यालयाच्या वर्गात MSB च्या खाली एक ट्रान्स्मीटर लावला जातो. महाविद्यालय सुटण्याच्या वेळेनंतर  वर्गात जर लाईट चालू असेल तर याचा डेटा रिसिव्हरला पाठवला जातो,  आणि वर्गातील लाईट आपोआप बंद होते. 

5. डिझाइन ऑफ ऑटोमेटेड शुगरकेन कटर विथ बड डिटेक्शन - यामध्ये इमेज प्रोसेसिंग आणि रासबेरी पाय (Rasberry Pi)  चा वापर करुन ज्या उसाच्या कांडीला डोळे आले आहेत ते पेरं मशीनद्वारे कापले जाते. यामुळे ऊस लागवड करताना लागणारा वेळ, पैसा यांची बचत होते आणि मनुष्यबळ कमी लागते .

6. अँटीथेफ्ट सिस्टीम फॉर इलेक्ट्रिक मोटर पंप - शेतात बसवलेले वीजेचे पंप चोरीला जातात. याला आळा घालण्यासाठी सेंसर आणि कंट्रोलर चा वापर करुन मोटर किंवा केबल ला काही हानी होत असल्यास शेतकऱ्याला तात्काळ त्याच्या मोबाइलवर संदेश प्राप्त होईल. 

7. ऑटोमेटेड कॉटन प्लकिंग रोबोट - यात विशिष्ट प्रकारचा रोबोट बनवला असून  हा रोबोट त्याचा बाहू  विशिष्ट कोनात फिरुन कापसाची बोंडे शोधून काढत वेचतो. ही पद्धत कमी खर्चिक आहे.

8. स्मार्ट सर्फेस माउंटिंग डिव्हाइस - जुन्या पद्धतीच्या सोल्डरींग गन मध्ये आपल्याला दोन्ही हात कामात वापरावे लागतात. नवीन संशोधनात छोट्या आकाराच्या गन मध्येच नायक्रोम वायर आणि फिलर मेटल वायर एकत्रित बसवण्यात आल्या आहेत, जेणेकरुन गन आपल्याला एका हाताने व सोप्या पद्धतीने वापरता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com