वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणे महापालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय; खासगी हॉस्पिटलमधील...!

Corona-Patient
Corona-Patient

पुणे : पुण्यात कोरोनाचा आवेग वाढत असल्याने विशेषत: अत्यवस्थ रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार देण्याकरिता खासगी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील (आयसीयू) 80 टक्के खाटा नियंत्रित राहणार आहेत. मात्र, त्यातील 50 टक्के खाटा या कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

त्यानुसार 16 हॉस्पिटल व्यवस्थापनांना आदेशही दिला आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार असून, ज्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी (ता.१७) स्पष्ट केले. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाच त्यात रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याचेही प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम मृत्यूदरात होत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना सर्वत्र 'आयसीयू'तील खाटा आणि ऑक्‍सिजनचे सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्याअंतर्गंत पहिल्या टप्प्यात खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के खाटा नियंत्रित करण्यात येणार आहेत. यांसर्भात सर्व हॉस्पिटल व्यवस्थापनांना राज्य सरकारच्या नियमांचे पालन करावे लागेल, असे गायकवाड यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. 

हॉस्पिटलमधील खाटा नियंत्रित करणे म्हणजे त्या आरक्षित करणे असा नाही; तर त्या खाटांवरील रुग्णांच्या उपचार खर्चावर (बिले) नियंत्रण असणे असा आहे. त्यानुसार कोरोना आणि कोरोना नसलेल्या अन्य आजाराच्या रुग्णांसाठी या खाटांचा वापर करता येणार आहे. राज्य सरकारच्या नियमांनुसार बिल व्हावे, अशीही अपेक्षा या मागे आहे. या नियंत्रित खाटांपैकी 50 खाटा या कारोना रुग्णांसाठी आरक्षित असतील. 

ही आहेत हॉस्पिटल्स :
- सह्याद्री हॉस्पिटल - येरवडा, महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशन हॉस्पिटल
- रत्ना हॉस्पिटल - सेनापती बापट रस्ता
- देवयानी हॉस्पिटल - कोथरुड 
- शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक - रास्ता पेठ 
- के.ई.एम. हॉस्पिटल - सोमवार पेठ 
- रुबी हॉल क्‍लिनिक
- संजीवन हॉस्पिटल - कर्वे रस्ता 
- एम. जे. एम. हॉस्पिटल 
- जहांगीर हॉस्पिटल - ससून रस्ता 
- रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल 
- ज्युपिटर लाइफलाईन हॉस्पिटल - बाणेर 
- कोलंबिया आशिया हॉस्पिटल - नगर रस्ता  
- श्री क्रिटिकेअर ऍण्ड ट्रॉमा सेंटर हॉस्पिटल 
- विलू पूनावाला हॉस्पिटल 
- एम्स हॉस्पिटल औंध
- इनामदार हॉस्पिटल - कोंढवा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com