esakal | पुण्यात अडकलेल्या 80 जणांनी केले जम्मू-काश्मीरकडे प्रस्थान
sakal

बोलून बातमी शोधा

Kashmir_Students

नागपूरपर्यंत जाण्यासाठी तीनही बस रवाना करण्यापूर्वी 
फूड पॅकेट, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात आली.

पुण्यात अडकलेल्या 80 जणांनी केले जम्मू-काश्मीरकडे प्रस्थान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे येथे शिकणारे जम्मू-काश्मीरच्या 65 विद्यार्थी आणि 15 नागरिकांना घेऊन महामंडळाच्या तीन गाड्या नागपूरला रवाना झाल्या. तेथून हे सर्वजण रेल्वेने जम्मू काश्मीरला जातील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी यांना त्यांच्या राज्यात अटी-शर्तींची पूर्तता करून जाऊ देण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे वंदे मातरम संघटना, सरहद पुणे यांनी शहरातील काश्मिरी विद्यार्थ्यांची परतण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती.

आपापल्या गावी परतणाऱ्या मजुरांना येत आहेत अशा अडचणी

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी या ऐंशी जणांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून नागपूरपर्यंत पोचविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी नीता शिंदे आणि समन्वय सहायक विवेक जाधव यांनी या नागरिकांकडून हमीपत्र भरून घेणे, आरोग्य तपासणी करणे याबाबत आवश्यक कार्यवाही केली. 

कृषी विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळपत्रक जाहीर; वाचा 'ही' महत्वाची बातमी

नागपूरपर्यंत जाण्यासाठी तीनही बस रवाना करण्यापूर्वी 
फूड पॅकेट, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात आली. सोशल डिस्टन्सिगचे पालन, मास्कचा वापर या सर्व बाबींचा अवलंब करण्याच्या सर्व प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आणि दुपारी चारच्या सुमारास या बस नागपूरच्या दिशेने रवाना झाल्या.

मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला मिळणार 'एवढी' रक्कम!

तेथून रेल्वेने हे सर्वजण जम्मू काश्मीरला पोचतील. त्यासाठी रेल्वेची व्यवस्था आधीच करण्याच आल्याचे डॉ. कटारे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा