80 व्या वर्षीही आजोबा चालवितात रिक्षा (व्हिडीओ)

प्रवीण खुंटे
शनिवार, 19 मे 2018

पुणे - वयाच्या साठीनंतर कामातून निवृत्ती घ्यायची आणि आयुष्यभर कमवलेल्या पुंजीवर पुढील आयुष्य जगायचे, असा सर्वसाधारण प्रघात आहे. परंतु, भवानी पेठेतील गिरणी वाड्यात राहणारे वसंतराव आडेप (वय ८०) हे मात्र दररोज आठ तास रिक्षा चालवून, या वयातही अर्थार्जन करीत आहेत.  

पुणे - वयाच्या साठीनंतर कामातून निवृत्ती घ्यायची आणि आयुष्यभर कमवलेल्या पुंजीवर पुढील आयुष्य जगायचे, असा सर्वसाधारण प्रघात आहे. परंतु, भवानी पेठेतील गिरणी वाड्यात राहणारे वसंतराव आडेप (वय ८०) हे मात्र दररोज आठ तास रिक्षा चालवून, या वयातही अर्थार्जन करीत आहेत.  

आडेप हे अजूनही तंदुरुस्त आहेत. त्यामुळेच आठ तासांची ड्यूटी ते सहजपणे करू शकतात. दररोज प्राणायामामुळे मिळणारी ऊर्जा काम करताना प्रोत्साहन देते, असे ते सांगतात. वयोमानानुसार मागे लागणाऱ्या शारीरिक व्याधींपासूनही ते दूर आहेत. सुरवातीला गरज म्हणून रिक्षा चालविता चालविता तब्बल ५० वर्षांचा टप्पा त्यांनी पार केला आहे. पत्नीची साथ मिळाल्यामुळे तीन मुलींची लग्नही त्यांनी पार पाडली आणि मुलालाही चांगले शिक्षण दिले ते केवळ रिक्षाच्याच ड्यूटीवर. आडेप यांचे कुटुंब आता स्थिरसावर झाले असले तरी, इतक्‍या वर्षांची सवय घरात स्वस्थ बसूच देत नाही, म्हणून सहा-आठ तास रिक्षा चालवतो, असे ते सांगतात. त्यातूनच सहा नातवंडांचेही लाड करता येईल, 

स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या लढ्यात तुरुंगवास भोगलेल्या आडेप यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी, भाई वैद्य, ना. ग. गोरे, डॉ. बाबा आढाव आदी समाजवादी विचारांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. १९६९ पासून रिक्षा चालविताना, सुरवातीला एटाली कंपनीचे मोटार सायकल रिक्षा होती. त्यात दोनच प्रवासी बसायचे. सुमारे २५ वर्ष भाड्याने रिक्षा चालवली. त्यानंतर १९९२ मध्ये स्वतःची रिक्षा घेतली.

बेशिस्तीवर बोट
आडेप दुपारी बारा ते सायंकाळी सात-आठ वाजेपर्यंत रिक्षा चालवितात. शहरातील वाहतूक रात्री भरधाव आणि बेशिस्त होत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. सहचारिणीप्रमाणेच रिक्षाकडे लक्ष देत असल्यामुळे तिची साथ मोलाची ठरते, अशीही भावना आडेप व्यक्त करतात.

 

Web Title: 80 years old man rickshaw driver motivation