रिंगरोडसाठी पिंपरीत आठशे इमारती पाडणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

पिंपरी - शहरातील नियोजित रिंगरोडच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या रहाटणी, थेरगाव आणि वाल्हेकरवाडी येथील सुमारे साडेआठशे इमारती भुईसपाट करणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांनी सोमवारी ‘सकाळ’ला दिली.

खडके म्हणाले, ‘‘हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रोडचे (एचसीएमटीआर) सुमारे ७० टक्के क्षेत्र ताब्यात आहे. प्राधिकरण हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. सुमारे ३० किलोमीटर लांब रस्त्यात साडेपाच किलोमीटर अंतरात अतिक्रमण झाले आहे. त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. थेरगाव पेठ क्रमांक ३५ आणि ३७ मध्ये ३०० पेक्षा जास्त, रहाटणी परिसरातील पेठ क्रमांक ३८, ३९ मध्ये सुमारे १००हून जास्त अतिक्रमणे आहेत. वाल्हेकरवाडीतील संपादित क्षेत्रात पेठ क्रमांक ३०, ३१, ३३ मध्ये तब्बल ४५० इमारती बांधल्याचे आढळले आहे.पोलिस बंदोबस्त उपलब्ध होईल तशी बांधकामे पाडण्यात येतील. रिंगरोड पूर्णतः रिकामा करण्याचे नियोजन आहे.’’

Web Title: 800 building demolish for ringroad