Big Breaking : पुण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा उच्चांक; एकाच दिवसात 'इतक्या' रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही रविवारी (ता.१६) रात्री ९ वाजल्यापासून सोमवारी (ता.१७) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता.१७) दिवसभरात १ हजार ८२९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील ८३५ जणांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात ८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील एकूण मृत्यूच्या आकड्यांचा सोमवारी उच्चांक नोंदविला गेला आहे. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये ६८१, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २२८, नगरपालिका क्षेत्रात ८० आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ५ नवे रुग्ण सापडले आहेत.

पानशेतही ओव्हर फ्लो; मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढला!​

दिवसभरात झालेल्या एकूण ८२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४७, पिंपरी-चिंचवडमधील २२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५, नगरपालिका क्षेत्रातील ८ जणांचा समावेश आहे. सोमवारी कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही रविवारी (ता.१६) रात्री ९ वाजल्यापासून सोमवारी (ता.१७) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

पुणे जिल्ह्यातील सोमवारी अखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख २७ हजार २६, तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या ३ हजार १०४ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ८३ रुग्णांचा समावेश आहे. 

- पुणे : चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली पेठांमधली तीन दुकाने; पण...

एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ७४ हजार ९३३, पिंपरी चिंचवडमधील ३६ हजार ७८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १० हजार १८४, नगरपालिका क्षेत्रातील ३ हजार ९९ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रातील २ हजार ७३२ रुग्ण आहेत.

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या :

- पुणे शहर - ५८ हजार ७०६.

- पिंपरी चिंचवड - २६ हजार ४९१.

- जिल्हा परिषद - ७ हजार ७५९.

- नगरपालिका - २ हजार २५१.

- कॅंंटोन्मेंट बोर्ड - २ हजार १२८.

- एकूण - ९७ हजार ३३५

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 82 corona patients died in Pune district on Monday 17th August 2020