पुणे : चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली पेठांमधली तीन दुकाने; पण...

Pune_Crime
Pune_Crime

पुणे : मागील काही दिवसांपासून चोरट्यांकडून शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमधील दुकाने लक्ष्य केले जात असल्याची सद्यस्थिती आहे. दरम्यान, चोरट्यांनी भवानी पेठ आणि रविवार पेठेतील कुलुपबंद दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

भवानी पेठेतील चोरीबाबत अमित ओसवाल यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी यांच्या मालकीचे भवानी पेठेत श्रीराम टेक्‍सटाईल नावाचे दुकान आहे. शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करुन घरी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळच असलेल्या जयंत गुणराणी यांचे चिमनालाल गोविंददास नावाचे खाद्यतेल आणि वनस्पती तूप विक्री दुकानाचेही शटर उचकवटून आतमध्ये ठेवलेली रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न झाला.

या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीच चोरट्यांनी रविवार पेठेतील तीन दुकाने फोडली. याप्रकरणी पृथ्वीराज बारड यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे रविवार पेठेत राज हॅंडलूम आणि होजीअरी नावाचे दुकान आहे. दुकान बंद असताना चोरट्यानी दुकानाचे शटर तोडले. तसेच जवळच असलेल्या अथर्व गारमेंट्‌स, राजल ट्रेडिंग कंपनी ही कुलूपबंद दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न केला. भवानी पेठ आणि रविवार पेठत दुकाने फोडून गल्ल्यातील रक्कम चोरून नेण्याचा चोरट्यांचा इरादा होता. मात्र, चोरट्यांना रोख रक्कम मिळाली नाही. 

दरम्यान, यापूर्वीही देखील कोरेगाव पार्क, औंध, खडकी, येरवडा परिसरामध्ये दुकाने, मेडीकल शॉप आणि अन्य मौल्यवान साहित्याची दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे. त्यादृष्टीने पुणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवडमधील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली होती. त्यानंतर देखील दुकानांमधील चोरीचे सत्र थांबत नसल्याची चिन्हे आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com