esakal | दहावीच्या अंतर्गत मुल्यमापनाला ८३ टक्के शाळांचा होकार
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

दहावीच्या अंतर्गत मुल्यमापनाला ८३ टक्के शाळांचा होकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - दहावीच्या विद्यार्थ्यांचे (SSC Student) अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी राज्यातील ८३ टक्के शाळांनी (School) तयारी  दर्शविला आहे. तर अकरावीच्या प्रवेशासाठी (Eleventh Admission) स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) (CET) घेण्याला तब्बल ६५ टक्के विद्यार्थ्यांनी (Student) होकार दिला आहे. या दोन्ही सर्वेक्षणाचा (Survey) आधार घेऊन शालेय शिक्षण विभागातर्फे (Education Department) पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. (83 percent of schools agree to the internal assessment of class X)

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली. त्यामुळे दहावीचा निकाल कसा जाहीर करायचा, विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश कसा द्यायचा, असे अनेक प्रश्न समोर आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी संबंधित घटकाची मते जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले आहे. ‘दहावीच्या विद्याथ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणे शाळांना शक्य आहे की नाही’ यावर शाळांची आणि ‘अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घ्यावी का’, यावर दहावीच्या विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यासाठी दोन स्वतंत्र सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणातंर्गत सोमवारपर्यंत दोन लाख ७३ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी, तर १९ हजार १५८ शाळांनी माहिती भरली आहे. विद्यार्थ्यांना आणि शाळांना मत नोंदविण्यासाठी मंगळवारपर्यंतची (ता.११) मुदत आहे, असे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) उपसंचालक विकास गरड यांनी सांगितले.

हेही वाचा: पुण्यातील हाय अलर्ट गावांमध्ये घराबाहेर पडण्यास मज्जाव; घरातही हवा मास्क

अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी का?

उत्तर : टक्केवारी : मत नोंदविलेले विद्यार्थी

- होय : ६५.५८ टक्के : १,७९,६५८

- नाही : ३४.४२ टक्के : ९४,२८६

दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणे शक्य होईल का?

- उत्तर : टक्केवारी : मत नोंदविलेल्या शाळा

- होय : ८३.१३ टक्के : १५,९२६

- नाही : १६.८७ टक्के : ३,२३२

पुणे जिल्ह्यातील शाळा आणि विद्यार्थ्यांनी नोंदविली मते

अकरावीच्या प्रवेशासाठी एक स्वतंत्र ‘सीईटी’ परीक्षा घ्यावी की नाही, यावरील सर्वेक्षणात पुणे जिल्ह्यातील २९ हजार ३७६ विद्यार्थ्यांनी मत नोंदवित प्रतिसाद दिला आहे. तर दहावीच्या अंतर्गत मुल्यमापनासाठी शाळा तयार आहेत की नाही, याबाबत एक हजार २७८ शाळांनी माहिती दिली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.