esakal | उरुळी कांचन येथील गॅस शवदाहिनीसाठी 84 लाखांचा निधी मंजूर

बोलून बातमी शोधा

ajitpawar
उरुळी कांचन येथील गॅस शवदाहिनीसाठी 84 लाखांचा निधी मंजूर
sakal_logo
By
जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

उरुळी कांचन (पुणे)- सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी उभारण्यासाठी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर रकमेपैकी १०% निधी ग्रामपंचायतीकडे वितरित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी (ता. २२) एका पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, उरुळी कांचन येथे गॅस शवदाहिनीसाठी प्रशासकीय मान्यता व शवदाहिनी उभारण्यासाठी तब्बल ८४ लाख रुपयांचा मिळवुन दिल्याबद्दल उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन व उपसरपंच संचिता कांचन यांनी उपमुख्मंत्री अजित पवार व आमदार अशोक पवार यांचे आभार मानले आहेत. गॅस शवदाहिनी उभारण्यासाठी जसे प्रयत्न केले तसेच प्रयत्न उरुळी कांचन व परीसरासाठी पाणी पुरवठा योजनेसाठीही आमदार अशोक पवार यांनी करावेत अशी मागणीही संतोष कांचन व संचिता कांचन यांनी केली आहे.

हेही वाचा: पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन म्हणाले, ''उरुळी कांचन व परीसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, उरुळी कांचन येथील स्मशानभुमित गॅस शवदाहिनी उभारावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली होती. गॅस शवदाहिनी उभारण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी जिल्हा परीषद सदस्य किर्ती कांचन, उपसरपंच संचिता कांचन यांनी आमदार अशोक पवार यांची भेट घेतली होती. याबाबत अशोक पवार यांनीही उरुळी कांचन येथील नागरीकांची अडचण लक्षात घेऊन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन वरील कामासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी (ता. २२) गॅस शवदाहिनीसाठी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीला दिले आहे. आमदार अशोक पवार यांचे आभार, पाणी पुरवठा योजना मंजुरीसाठीही असेच प्रयत्न करावेत.''

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर