रविवारी दिवसभरात साडेआठ कोटी जमा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुणे - कराचा भरणा करण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर गेल्या तीन दिवसांत महापालिकेला तब्बल 56 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रविवारी एका दिवसात 8 कोटी 40 लाख रुपयांची वसुली झाली. कराचा भरणा करण्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा सोमवारीही (ता. 14) स्वीकारल्या जाणार आहेत. 

महापालिकांचा मिळकतकर आणि पाणीपट्टी भरण्यासाठी पाचशे व हजारांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, महापालिकेच्या माध्यमातून सध्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी महापालिकेला करातून तब्बल 36 कोटी 95 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 7 कोटी 44 लाखांचे कर जमा झाला. तर रविवारी सुटीच्या दिवशीही तब्बल 8 कोटी 39 रुपये जमा झाल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी (ता. 14) रात्री बारापर्यंत मिळकतकर व पाणीपट्टी भरण्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची अंतिम मुदत असणार आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी उत्पन्नात अधिक भर पडण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, स्थानिक संस्था कर विभागाकडूनही वार्षिक विवरणपत्रे दाखल न करणाऱ्या नोंदणीधारकांना करण्यात आलेल्या दंडाची रक्कमही पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून सोमवारी स्वीकारण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी कळविले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8.5 million deposit on Sunday