baramati.jpg
baramati.jpg

बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीमध्ये 87.93 टक्के मतदान

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीपैकी बिनविरोध झालेली मगरवाडी व भोंडवेवाडी ग्रामपंचायत वगळता उर्वरित 13 ग्रामपंचायतीच्या साठी रविवारी (ता.27)  87.93 टक्के मतदान झाले. यामध्ये एकुण 25503 मतदारांपैकी 22424 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक 92.34 टक्के मतदान चांदगुडेवाडी या ग्रामपंचायतीसाठी तर सर्वात कमी 81.45 टक्के मतदान सुपा ग्रामपंचीयतीच्या निवडणुकीसाठी झाले अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हनुमंत पाटील व नायब तहसिलदार आर.सी.पाटील यांनी दिली. 

यंदा प्रथमच सरपंच पदाची थेट जनतेतुन निवड होत आहे.यामध्ये दंडवाडीचे सरपंचपद बिनविरोध झाल आहे तर उर्वरित 12 गावांच्या सरपंच पदासाठी 38 उमेदवारांनी निवडणुक लढवली. तर तालुक्यातील सदस्य पदाच्या 143 जागांपैकी 53 जागा बिनविरोध व 2 जागा रिक्त राहिल्या आहेत तर उर्वरित 88 जागांसाठी 194 उमेदवार निवडणुकीत होते. आज च्या निवडणुकींमध्ये मतदारांमध्ये सर्वत्र उत्साह दिसला. किरकोळ वादावादी वगळता मतदान शांततेत पार पडले. तर सदस्य पदाच्या प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीमध्ये वडगाव निंबाळकर येथे 67.35 व मेडद येथे 84.91 टक्के मतदान झाले. 
     
दरम्यान सोमवारी (ता.28) मतमोजणी बारामती एमआयडीसी येथील रिक्रेएश हाँल येथे होणार आहे. प्रशासकिय पातळीवर मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पोलिस संरक्षणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती हनुमंत पाटील यांनी दिली.

  •  ग्रामपंचायतीचे नाव, मतदार संख्या, झालेल मतदान व टक्केवारी 

1) कोऱ्हाळे खुर्द - 2309 - 2087 (90.39)
2) सुपे - 3947 -  3215 (81.45)
3) वंजारवाडी - 1551 - 1278 (82.40)
4) करंजे -  1774 - 1496 (84.33)
5) मगरवाडी - (बिनविरोध)
6) भोंडवेवाडी - (बिनविरोध)
7) चांदगुडेवाडी - 1475 - 1362 (92.34)
8) दंडवाडी - 1676 - 1536 (91.65) 
9) जराडवाडी - 1261 - 1152 (91.36)
10) काळखैरेवाडी - 1564 - 1415 (90.47)
11) कुतवळवाडी - 1586 - 1447 (91.24)
12) पानसरेवाडी - 1340 - 1198 (89.40)
13) साबळेवाडी - 1385 - 1246 (89.96)
14) शिर्सुफळ - 3974 - 3528 (88.78)
15) उंडवाडी क.प. - 1661 - 1465 (88.20)
     एकुण - 25503 -  22425 (87.93)

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com