भोर- वेल्ह्यावर अजितदादांची कृपादृष्टी, तीन हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलीताखाली 

विजय जाधव
Tuesday, 8 September 2020

पुण्यातील शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार देशमुख आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भोर (पुणे) : भोर व वेल्हे तालुक्‍यातील तीन नद्यांवरील 12 कोल्हापुरी बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 9 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यातील शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार देशमुख आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस रणजित शिवतरे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे उपस्थित होते 

आता लग्नाची सीडीही पोलिस ठाण्यात द्यावी लागणार

शिवतरे म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपासून भोर-वेल्ह्यातील नीरा, कानंदी व गुंजवणी नदीवरील 12 कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. उन्हाळ्यात बंधाऱ्यात पाणी साठत नसल्यामुळे सिंचनाअभावी शेतीचे उत्पन्न घेता येत नव्हते. परंतु, पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे जलसंपदा महामंडळाच्या पाणीपट्टी कराच्या निधीतून सदर कामांना मंजुरी देण्यात आली. वेल्हे तालुक्‍यातील कोंढावळे, खरीव, दापोडे, कोंढवली व मार्गासनी आणि भोर तालुक्‍यातील जांभळी, दीडघर, मोहरी, नांदगाव, आंबेघर, वेनवडी व भोर ऑरलॅब येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. 
 

या निर्णयामुळे 12 बंधाऱ्यांमधून 261 दशलक्ष घनफूट पाणी साठवण होणार असून, एकूण 3 हजार 92 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामध्ये भोर तालुक्‍यातील 40 गावांमधील 1 हजार 819 हेक्‍टर क्षेत्र व वेल्हे तालुक्‍यातील 26 गावांमधील 1 हजार 73 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. 
- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 crore 50 lakh sanctioned for Bhor and Velhe talukas