esakal | आजच्या दिवशी याच महिन्यात पण मागच्या वर्षी; राज्यातील कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा अनुभव?

बोलून बातमी शोधा

9 march 2020 First Covid 19 Positive patients of State Found in pune}

पुण्यात धायरी परिसरातील रहिवासी असलेले दाम्पत्य त्यांच्या मुलीसह दुबईवरुन 40 लोकांच्याग्रुपसोबत पुण्यात परतले होते. मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 मार्चला त्यांचे विमान उतरले होते.

आजच्या दिवशी याच महिन्यात पण मागच्या वर्षी; राज्यातील कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा अनुभव?
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महाराष्ट्रात कोरोनाचे पहिले 2 रुग्ण आढळल्याच्या घडनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. पुण्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नऊ मार्च रोजी आढळले. ''गेल्या एका वर्षात कोरोना विषाणूने घातलेले थैमान बघितल्यानंतर आमचे प्राण वाचविल्याबद्दल मी डॉक्टरांचा ऋणी आहे'' अशी प्रतिक्रिया पुण्यात सापडलेल्या पहिल्या रुग्णांनी दिली.

पुण्यात धायरी परिसरातील रहिवासी असलेले दाम्पत्य त्यांच्या मुलीसह दुबईवरुन 40 लोकांच्याग्रुपसोबत पुण्यात परतले होते. मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 मार्चला त्यांचे विमान उतरले होते. त्यांनतर त्यातील प्रवासी मुंबई, नागपूर, पुणे सह राज्यातील विविध भागातील घरी परतले होते.

हातभट्ट्यांच्या जागेवर चिमुकल्यांसाठी मैदान ! मुळेगाव तांड्याची ओळख पुसण्यासाठी...

पहिले रुग्ण सापडल्यानंतर सह प्रवाशांना कोणतेही लक्षण नसले तरी खबरदारी म्हणून स्वॅब टेस्ट करण्यात आले. 8 दिवसांमध्ये टेस्ट रिपोर्ट येण्यापूर्वीच पहिल्या 2 कोरोना संशयित रुग्णांना 9 मार्चला पुणे महापालिकेच्या नायडु हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर दाम्पत्यांची मुलगी देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. कोरोना विषाणूचा प्रसार वेगात होत असल्याने दाम्पत्यासह मुंबई एअरपोर्ट ते पुणे दरम्यान प्रवास करणारा कॅब ड्राईव्हर देखील पॉझिटिव्ह  असल्याचे समोर आले. 

''महाराष्ट्रातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असणे हा खूप मोठा धक्का होता. कोरोनातून बरे झाल्यानतंर विलगीकरणाचा काळ पूर्ण करून इतर रुग्णांसोबत आम्ही घरी परतलो.  डिस्चार्ज झाल्याच्या एका महिन्यानंतर मी प्लाझ्मा डोनेशनसाठी पुढाकारही घेतला. तसेच विलगीकरणाच्या काळात कशी काळजी घ्यावी याबाबतही मी लोकांना माहिती दिली'' असे ही त्यांनी यावेळी सांगितले. 

केवळ एका गोष्टीच्या मदतीने आपण आपली सर्व उद्दिष्टे पूर्ण करू शकता ! जाणून घ्या... 

तसेच ते पुढे म्हणाले,  ''जर गेल्या वर्षी सरकाराने या काळात कडक निर्बंध लागू केले असते तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव 3-4 महिन्यातच संपला असता. आम्हाला कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर आम्ही स्वत:च हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, आमच्यावर कोणीही दबाव टाकला नव्हता. त्याचप्रमाणे, कोरोनाची लक्षणे आढळल्यावर वेळीच कोरोनाची चाचणी करणे अपेक्षित होते.''  
 
जागतिक कोरोना महामारीच्या काळात पहिला रुग्ण आढळल्यापासून ते कोरोना प्रतिबंधक लस निर्मीतीमध्ये मुख्य केंद्र होईपर्यंत सर्व घडामोंडीचे केंद्रबिंदू  पुणे ठरले.

#LetsTalkCPPuneCity : पुणेकरांच्या प्रश्नाला पोलिस आयुक्तांचे ट्विटरवर मार्मिक उत्तर