'त्या' नऊ मित्रांचा तो ठरला अखेरचा फोटो

जनार्दन दांडगे
शनिवार, 20 जुलै 2019

सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत समोर भरधाव इरटीका चार ट्रकवर जाऊन धडक होऊन झालेली भीषण अपघातात इरटीकामधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. हे नऊ जण एकमेकांचे मित्र असून, गुरुवारी ( ता. १८) सकाळी रायगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. तेथे त्यांनी एकत्र काढलेला फोटो त्यांच्यासाठी अखेरचा ठरला.

लोणी काळभोर : सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत समोर भरधाव इरटीका चार ट्रकवर जाऊन धडक होऊन झालेली भीषण अपघातात इरटीकामधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. हे नऊ जण एकमेकांचे मित्र असून, गुरुवारी ( ता. १८) सकाळी रायगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. तेथे त्यांनी एकत्र काढलेला फोटो त्यांच्यासाठी अखेरचा ठरला.

रायगड परिसरात दोन दिवस सुट्टी घालवून घराकडे परतत असताना कदम वाकवस्ती येथे शुक्रवारी रात्री काळाने घाला घातला. नऊ जणांपैकी तीन जण लोणी काळभोर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होते. तर दोंन जण पुणे येथील जेएसपीएमएस महाविद्यालयात शिक्षण घेत होते. तर दोघे लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये बाऊन्सर म्हणून काम करत होते.

पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर सोलापूरच्या दिशेने जाणार्‍या इरटीका या चार चाकी गाडीतील चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने. दुभाजक ओलंडुन ट्रकला समोरच्या बाजूने जोरात धडक दिली. ही एवढी जोरात धडक होती की कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. दोन जण गाडीत अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाने बाहेर काढले.

पुणे- सोलापूर रस्त्यावर ट्रक-कारचा भीषण आपघात; 9 जणांचा मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 Students killed in a car accident near Loni Kalbhor in Pune