नऊ जणांच्या जाण्याने यवतवर शोककळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथे झालेल्या अपघातात यवतमधील (ता. दौंड) नऊ जण ठार झाल्याने यवतवर शोककळा पसरली आहे.  यवतमधील सर्व व्यवहार आज सकाळपासूनच बंद ठेवण्यात आले आहेत.

केडगाव : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथे झालेल्या अपघातात यवतमधील (ता. दौंड) नऊ जण ठार झाल्याने यवतवर शोककळा पसरली आहे.  यवतमधील सर्व व्यवहार आज सकाळपासूनच बंद ठेवण्यात आले आहेत.

दुभाजक ओलांडून आलेल्या इरटीका कारने ट्रकला धडक दिली. कार मधील सर्व जण ठार झाले. मृतांमध्ये अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद आशपाक अत्तार, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजित मुलाणी यांचा समावेश आहे. 

सर्व मृत वीस ते बावीस वयोगटातील आहेत. सर्व युवक काल ताम्हिणी घाटात वर्षा विहारासाठी गेले होते.  काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. घटनेची माहिती यवतमध्ये धडकल्यानंतर नातेवाईक व  कार्यकर्त्यांनी लोणी काळभोरकडे धाव घेतली. दुखवटा म्हणून यवतमधील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. मृतांच्या घरी नातेवाईकांनी गर्दी केली आहे. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत शवविच्छेदनाचे काम ससून रुग्णालयात चालू होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 Students killed in a car accident near Loni Kalbhor in Pune near Yavat